शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खे़ड-शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित, स्थानिकांना तूर्तास टोल सक्तीतून दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 20:46 IST

स्थानिकांकडून जर टोल आकारला तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.

खेड- शिवापूर  : राज्यातील वाहनचालक आणि वाहतूक चालकांना काल मध्यरात्रीपासून (दि.१५) रात्री १२ वाजल्यापासून शिवापूर टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्याने वसुली धडाक्यात सुरू होती. मात्र, ज्या वाहन चालकांनी तो भरलेला नव्हता. त्यांच्याकडून दाम दुप्पट वसूल केली जात होती. तर अनेकांनी टोल भरणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे टोल नाक्यावर वाद होत होते. काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडली. 

खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर स्थानिक व रोखीने फास्ट भरणाऱ्यांना दोन लेन ठेवल्या होत्या तर उर्वरित फास्टटॅग भरणाऱ्यांसाठी लेन उपलब्ध केल्या होत्या. मात्र रोखीने फास्ट टॅग भरणाऱ्यांची लेन मात्र लांबच लाब होती. देशभरात फास्ट टॅग अनिवार्य केला गेला असला तरी अनेक वाहनचालकांना याबाबत पूर्ण कल्पना नसल्याने गोंधळाचे चित्र होते.

मंगळवार (दि.१६ ) पासून खेड - शिवापूर टोलनाक्यावर सर्व लेन फास्टटॅग केल्या आहेत. फास्टॅगमुळे प्रत्येक वाहन कमी वेळेत टोल पार करत होते. यामुळे खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहतूक सुरळीत चालू होती. ज्या वाहनांचा फास्टॅग स्कॅन होत नव्हता. त्या वाहनांजवळ जाऊन स्कॅन केला जात होता. पूर्वीच्या नियमानुसार स्थानिक वाहनांना (MH-12 व MH-14) मोफत सोडण्यात येत होते. मात्र , अजूनही अनेक वाहनांनी फास्टॅग काढला नसल्याने त्या वाहनांसाठी दोन लेन सोडण्यात आल्या होत्या. 

फास्टॅगबाबत टोल प्रशासनाचे व्यवस्थापक अमित भाटिया म्हणाले, सरकारच्या नियमानुसार सर्वच लेन ह्या फास्टॅग करणार आहे, अथवा केल्या आहेत. ज्या वाहनांनी तो काढला नाही त्यांच्याकडून दुप्पट टोल घेत आहोत. स्थानिकांना ज्याप्रमाणे पूर्वी मोफत सोडत होतो त्यांना आजही मोफतच सोडत आहे. मात्र, फास्टटॅग नियम सुरू झाला असल्याने त्यांनाही मी विनंती करत आहे की, केवळ २७५ रुपयांमध्ये आपण मासिक पास देणार आहोत याचा फायदा स्थानिक नागरिकांनी घ्यावा.

शहरातील गाड्यांना पण फास्टॅग सक्ती , हे काय चाललंय नक्की?  केंद्रीय मोटर वाहन नियमावलीनुसार तुमची चारचाकी गाडी  जरी कधी टोलरोड वर जाणार नसेल , तुम्ही अगदी फक्त शहरातच गाडी चालवत असाल  तरी तुम्हाला २०० रूपये खर्च करून फास्टॅग बसवावाच लागेल , त्याशिवाय विमा नुतनीकरण होणारच नाही , एवढंच नाही तर अशी फास्टॅग नसलेली गाडी शहरात पकडली गेली तर पहिल्यांदा ३०० रुपये आणि दुसर्यांदा पकडली गेली तर ५०० रुपये दंड होईल. दरवर्षी वाढत चाललेल्या विमा हप्त्यावर हा आणखी एक भुर्दंड पडणार आहे. विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच 

.... 

... तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.

सध्या तरी MH-12 व MH-14 नंबर असलेल्या वाहनांना मोफत सोडत आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाने सांगितल्यानुसार,  संघर्षाची भूमिका घेणार नाही. मात्र स्थानिकांकडून जर टोल आकारला तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल. स्थानिक पातळीवरील वाहनांना चार स्वतंत्र मार्गिका सोडण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन आजच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. पुढील चार दिवसात आमदार, खासदार यांना घेऊन जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर म्हणाले.

 

 

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाFastagफास्टॅगfour wheelerफोर व्हीलर