शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 20:12 IST

प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे 62 व्या वर्षी ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने फॅशन जगतात माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे.

पुणे : प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे मंगळवारी सकाळी 5 वाजता निधन झाले. ते 62 वर्षांचे हाेते. अनेक सिनेकलाकारांसाठी त्यांनी कपडे डिझाईन केले हाेते. दीड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन ट्युमर झाला हाेता. पुण्यातील रुबीहाॅल क्लिनिकमध्ये उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची अाई, पत्नी, दाेन मुली असा परिवार अाहे. 

    दीपक शहा हे फॅशन जगतातील माेठे नाव हाेते. त्यांनी 1987 साली मुंबईमध्ये माेअरमिश्चिफ या नावाने त्यांचे दुकान सुरु केले. त्यांच्या अाकर्षक डिझाईन्समुळे अनेक सिनेकलाकार त्यांच्याकडून अापले कपडे डिझाईन करुन घेत असत. जॅकी श्राॅफ, सुनिल शेट्टी, अमिताभ बच्चन, सलमान खान, सचिन तेंडुलकर अश्या दिग्गजांसाठी त्यांनी काम केले. मुंबईनंतर त्यांनी पुणे अाणि दुबईतही त्यांचे दुकान सुरु केले. पुणेकरांना एक वेगळी स्टाईल देण्यात दीपक शहा यांचा माेठा वाटा अाहे. दीड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर रुबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचार सुरु हाेते. त्यांच्या जाण्याने फॅशन जगतात माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे. 

    सुरुवातीपासून दीपक शहा यांच्यासाेबत काम करणारे त्यांच्या माेअरमिश्चिफचे मुख्य मास्टर सेबस्टिन डिकाेस्टा यांनी त्यांच्या अाठवणींना उजाळा दिला. जाेपर्यंत जीवंत असून ताेपर्यंत माेअरमिश्चिफला पुढे घेऊन जात राहू. दीपक शहा यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहू. त्यांनी त्यांच्या अायुष्यात माेठ्या कष्टाने वैभव उभे केले हाेते. त्यांच्या जाण्याने माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे,  अशी भावना डिकाेस्टा यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूfashionफॅशनnewsबातम्या