शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी झाला हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:47 IST

परिसरात कांदा काढणीला वेग आला असून कांद्याला योग्य भाव नसल्याने व वारंवार कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

चाकण - परिसरात कांदा काढणीला वेग आला असून कांद्याला योग्य भाव नसल्याने व वारंवार कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला हमीभाव मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चाकण परिसरात कांदा काढणीला वेग आला असून, चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा जनावरांच्या बाजारात ठेवावा लागत आहे. चाकण बाजारात २० हजार ९० क्विंटल आवक झाली आहे. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ७५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात मोठी नाराजी आहे. चाकण परिसरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेत आहे. यावर्षी चांगला भाव मिळेल अशी आशा शेतक-यांमध्ये होती, पण सध्याच्या भाजपा सरकारने शेतकºयांची घोर निराशा केली आहे, अशी शेतकºयांनी भावना व्यक्त केली आहे.यावर्षी कांदा लागवड करण्यासाठी रोपांचा तुटवडा असतानाही चाकण परिसरातील शेतकºयांनी कांदा रोप तयार करून व महागडी रोपे घेऊन कांदा लागवड केली. चाकण बाजारात प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने भावात घसरण होत आहे.भोरला कांदा उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडलेनेरे : आज ना उद्या कांद्याचा बाजारभाव वाढेल, या आशेवर भोर तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन-तीन वर्षांत कांद्याचे भरघोस पीक घेत होते. मात्र गेले दोन वर्षांपासून कांद्याला योग्य तो बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून शेतकºयांचे अर्थकरण कोलमडले आहे.गतवर्षी शेतकºयांनी काढलेला कांदा साठवणूक करून ठेवला होता. या वेळी तरी बाजारभाव वाढतील ही आशा शेतकºयांना होती. मात्र आजची परिस्थिती पाहता शेतकºयांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. त्यातूनच नवीन कांद्याची आवक चालू झाल्याने जुन्या कांद्याला कोणी विचारणासेही झाले आहे. नवीन कांदा चाळीस ते पन्नास रुपये तर जुना कांदा २० ते ३० रुपये १० किलो दराने बाजारात विकला जात आहे.मागील तीन वर्षांपूर्वी दहा किलोला ११० ते १४० रुपये भाव मिळाला होता.गतवर्षी शेतकºयांनी जास्तीत जास्त कांदा लागवड केली होती. मात्र बाजार घसरल्याने शेतकºयांच्या आशाच्या निराशा होऊन बसल्या आहेत. शासनाने कांदा निर्यातीकडे लक्ष देणे गरजेचे असून, हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.कांद्याचे रोप, लागवड, औषधफवारणी, काढणी, वाहतूक हा सर्व खर्च वजा जाता दोन वर्षांपासून शेतकरी तोट्यात असल्याचे बाजारवाडी (ता. भोर) येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कृष्णा शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :onionकांदाPuneपुणे