शेतकऱ्यांना नवीन खतांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:51+5:302021-06-09T04:13:51+5:30
चाकण : केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्याचे जाहीर केले आहे. परंतु राज्यात चढ्या दराने खतविक्री केली जात असल्याचे ...

शेतकऱ्यांना नवीन खतांची प्रतीक्षा
चाकण : केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्याचे जाहीर केले आहे. परंतु राज्यात चढ्या दराने खतविक्री केली जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे चाकण परिसरातील शेतकऱ्यांची खतखरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. नवीन खते उपलब्ध झाली नसली तरी जुनाच साठा गतवर्षीच्या दराने विक्री सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची बी बियाणे आणि खते खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना जुन्याच दरात खत मिळत आहे. राज्यातील कृषी केंद्राकडून नवीन दराने खतविक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप लावला जात आहे. चाकण परिसरात नवीन खत उपलब्ध झाले नाही फक्त युरिया मिळत आहे. तेही जुन्याच दरात विक्री केली जात आहे. माॅन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. यामुळे खते आणि बी बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची कृषी केंद्रात गर्दी होत आहे.
चाकण परिसरातील कृषी केंद्रात नवीन खते अजून उपलब्ध झाली नाही. बहुतांश जुनीच खते असून त्यांचीच विक्री सुरू आहे. नवीन खतांच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. येणारी नवीन खते ही जुन्याच दराने विक्री व्हावी यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
--
कोट १
शासनाच्या आदेशानुसारच अनुदानाप्रमाणे खतविक्री करणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. चाकण परिसरातील कृषी केंद्राने जादा दराने खतविक्री करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
- गोविंद नाळे,
मंडल कृषी अधिकारी, चाकण.
--
माॅन्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. अजूनही नवीन खते उपलब्ध झाली नसल्याने शेतकऱ्यांना नवीन खतांची प्रतीक्षा आहे. दरवर्षी खतांच्या किमती वाढत आहेत. या वर्षी किमती कमी केल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परंतु नवीन खते उपलब्ध झाल्यावरच किमती कमी केल्या आहेत की नाही हे स्पष्ट होईल. सध्या तरी जुनी खते आहे त्याच किमतीला विकली जात आहेत.
- दिनेश मोहिते पाटील,
प्रगतशील शेतकरी.
--
कोट २
खतांच्या किमती कमी केल्याचा दिलासा मिळेल असे मला वाटत नाही, कारण दरवर्षी महागाई वाढत चालली आहे. मात्र शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेती करणे तोट्यात जात आहे.
- साहेबराव पवार, प्रगतशील शेतकरी.
--
टेबल
खतांचे प्रकार आणि विक्रीदर
युरिया - ३०० रुपये.
१८:१८:१८ कृषी उद्योग - १०२५.
डी ए पी - १७२५ * १०:२६:२६ - ११७५
२४:२४:० - १२२०
२०:२०:१०:१३ - ९७५
अमोनिया सल्फेट - ६१५
सुफला १५:१५:१५ - १०६०
--------------------