शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘या ’ गावाची पाणीपट्टी करणार शेतकरीच वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 15:25 IST

नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगुजवणी धरण प्रकल्पांतर्गत १७८ पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्यात येणार धरणातील पाणी अत्याधुनिक पध्दतीने पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार

पुणे : गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना दिल्यानंतर पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवरच सोपविली जाणार आहे.या नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंजवणी धरण प्रकल्प पूर्ण झाला. धरणातील पाणी अत्याधुनिक पध्दतीने पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गुंजवणी धरणातून पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा १६ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाली. पाईपलाईनसाठी वेगळ्या प्रकारचे डिझाईन जलसंपदा विभागाने तयार केले आहे. चार वर्षात पाईपलाईनचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच संबधीत ठेकेदारास या पाईपलाईनची पाच वर्ष देखभाल करावी लागणार आहे. गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतक-यांच्या पिकांना  देण्यासाठी महाराष्ट्र सिंचन पध्दत व्यवस्थापन कायदा २००५ नुसार ह्यपाणी वापर संस्थाउभारण्यात येणार आहेत. संस्था स्थापनमध्ये शेतकरीच संचालक म्हणून काम करणार आहेत.जलसंपदा विभागाकडून त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देणार आहे. तसेच या पाणी वापर संस्थाच शेतक-यांकडून पाणीपट्टी वसुल करणार आहेत. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रविण कोल्हे म्हणाले,गुजवणी धरण प्रकल्पांतर्गत १७८ पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सोसायट्यामध्ये कार्यरत असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी वसुल करणे शक्य होईल. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून पाणीपट्टी वसूलीबाबत नवीन पध्दती अवलंबली जात आहे. त्याबाबतचे सादरीकरण औरगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या सूक्ष्म सिंचन कार्यशाळेत करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी