खरिपाची माहिती ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांनी भरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:44+5:302021-09-06T04:14:44+5:30

महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शासनाने ई-पीक पाहणी मोबाईल ॲप विकसित केले आहे. नसरापूर येथील कृष्णा फडतरे यांच्या ...

Farmers should fill in the kharif information in the e-crop survey | खरिपाची माहिती ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांनी भरावी

खरिपाची माहिती ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांनी भरावी

महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शासनाने ई-पीक पाहणी मोबाईल ॲप विकसित केले आहे. नसरापूर येथील कृष्णा फडतरे यांच्या शेतातील ई-पीक ॲपचे पाहणी प्रात्यक्षिक भोरचे तहसीलदार सचिन पाटील व परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. यावेळी नसरापूरचे मंडळाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, नसरापूरच्या सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, ज्ञानेश्वर झोरे, इरफान मुलानी, नामदेव चव्हाण, अश्विनी कांबळे, प्रशांत कोंडे, दत्तात्रेय वाल्हेकर, विजय जंगम, संतोष कोंडे, तुळशीराम फडतरे, गणेश शिळीमकर, अनिल शेटे, तलाठी नेहा बंड, अर्चना ठाकूर, विजय गयावळ व लिंबाजी लिह्मण उपस्थित होते.

सचिन पाटील म्हणाले की, ‘माझी शेती माझा सातबारा, मीच भरणार माझा पीकपेरा’ या उपक्रमात शेतकरी मोबाईलद्वारे सर्व पिकांची, बांधावरील झाडांची, विहीर बोअरवेल, गवतपड आदींच्या माहितीसह ॲपमध्ये माहिती भरू शकतील. ही ई-पीक पाहणी एका मोबाइल ॲपवर २० खातेदारांची ई-पीक पाहणी माहिती भरता येईल. त्यानंतरच संबंधित तलाठी माहिती तपासून अपडेट सातबाऱ्यावर उपलब्ध होणार आहे. काही अडचणी येत असल्यास मंडळाधिकारी, तलाठी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

०५ नसरापूर शेती

ई-पीक पाहणी ॲपच्या प्रात्यक्षिकप्रसंगी सचिन पाटील, श्रीनिवास कंडेपल्ली व इतर.

050921\img_20210831_141043.jpg

सोबतफोटो व ओळ : नसरापूर (ता. भोर) : ई पीक पाहणी अॅपच्या प्रात्यक्षिक प्रसंगी तहसीलदार सचिन पाटील,नसरापूरचे मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली आदी मान्यवर शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers should fill in the kharif information in the e-crop survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.