विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध
By Admin | Updated: March 5, 2016 00:42 IST2016-03-05T00:42:03+5:302016-03-05T00:42:03+5:30
कोये-पाईट नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या विमानतळाला पाईट परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत विमानाची प्रतिकृती जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध
पाईट : कोये-पाईट नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या विमानतळाला पाईट परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत विमानाची प्रतिकृती जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेसंदर्भामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी चार जागांपैकी एका जागेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यातही सर्व गोष्टींचा विचार करून खेड तालुक्यातील कोये, पाईट येथील जागेस हिरवा कंदील मिळाल्याचे सूचकपणे जाहीर केल्यावर, आज पापळवाडी येथील गणेश मंदिराजवळ परिसरातील शेतकरी जमले. या ठिकाणी होऊ घातलेल्या विमानतळास विरोध दर्शवत विमानाच्या प्रतिकृतीचे दहन करीत निषेध केला.
या वेळी जमलेल्या तरुणांनी घोषणाबाजी करीत विमानतळासाठी जागा देणार नसल्याचा सूर काढत निषेध केला.
या वेळी बोलताना पोपट राळे यांनी शासनाने विमानतळ जागेसंदर्भामध्ये शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती ठेवून विमानतळ या परिसरात करण्याचा डाव हाणून पाडू, असे सांगितले. तर पापळवाडी येथील शेतकरी भानुदास दरेकर यांनी या परिसरातील शेतकरी, भामा आसखेडमध्ये बाधित झालेला असताना, दुसऱ्यांदा त्यांची जागा संपादित करणे अन्यायाचे होईल, असे सांगितले. या वेळी परिसरातील
पोपट राळे, विलास दरेकर, भानुदास दरेकर, चंद्रकांत कोळेकर, आनंदा चोरघे, कालिदास राळे, मल्हारी लोंढे, अर्जुन डांगले, भरत दरेकर, विशाल डांगले, चांगदेव पापळ, वनाजी पापळ आदी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.