शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये पाण्याविना शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:54 IST

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतसिंचनाचा गहन प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे.

ठळक मुद्देभीमा नदी : चासकमान धरणातील पाण्यापासून वंचित; पिके अडचणीतपोटपाट, विहिरी तसेच नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे ठणठणीत

खेड : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भीमा नदीचा बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चासकमान धरणातून डाव्या कालव्याला सोडलेल्या विशेष आवर्तनापासून हा परिसर वंचित राहिला आहे. परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतसिंचनाचा गहन प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे. खेडच्या पूर्व भागातील बहुतांश गावे चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात या परिसरातील शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेत असतो. चासकमानच्या डाव्या कालव्याला आवर्तन मिळाल्यानंतर परिसरातील पोटचाऱ्यामार्फत पाणी विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांना वितरीत केले जाते. परंतु, या हंगामात कालव्याचे पाणी बंधाऱ्यात सोडले नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या या भागातील पोटपाट, विहिरी तसेच नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. शेलपिंपळगावच्या पश्चिमेला भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर गावातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. सध्या मात्र बंधाऱ्यात पाण्याचा साठा अजिबातच शिल्लक राहिला नाही. परिणामी बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असलेले शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद पडले आहेत. चासकमान धरणातील पाणी वाटपाबाबत सरपंच सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच सुमन मोहिते, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष काळूराम दौंडकर, माजी सरपंच सुभाष वाडेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय मोहिते, संचालक सयाजीराजे मोहिते, माजी उपसरपंच शरदराव मोहिते, सोसायटीचे माजी अध्यक्ष शरदचंद्र गणपत मोहिते, अध्यक्ष नवनाथ मोहिते, सर्जेराव मोहिते, सोपान दौंडकर, पांडुरंग दौंडकर, मधुकर दौंडकर आदी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :KhedखेडWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती