शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल भाव....शेतकऱ्याने दीड एकर कांद्याच्या शेतात सोडल्या शेळ्या मेंढ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:05 IST

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देमशागत, कांदा रोपे लागवड, खुरपणी, औषधे फवारणी यामध्ये ७० हजार रुपये पाण्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची केली लागवड

दावडी : दोन महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करुन कांदा पिकाची लागवड केली होती. या पिकातून चार दोन पैसे मिळतील आणि त्यातून कुटुंबाचा गाडा हाकण्यास मदत होईल ही अपेक्षा होती. पण सध्या कांद्याला जो भाव मिळतोय त्याने कांद्याचा साधा खर्च देखील वसूल होत नाही..त्यामुळेच खरपुडी (ता खेड )  येथील विजय काशिद या शेतकऱ्यांने दीड एकर कांदा पिकात शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्या.  मागील वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळाला म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली. मात्र, भावात ५०० ते ६०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. रोज नवा कांदा बाजारात येऊ लागल्यामुळे पुढे कांद्याला बाजार भाव मिळेल की नाही, उत्पादन खर्चही सुटणार नाही त्यामुळे अजुन कशात अजून कशाला तोट्यात जायचं अन् उद्या भाव वाढले तर..असे प्रश्न शेतकऱ्यांची द्विधावस्था करत आहेत.शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक शेतात तसेच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरपुडी परिसरातील येथील विजय काशिद या शेतकऱ्यांने आपल्या दीड एकर उभ्या कांद्याच्या पिकात शेळया मेंढ्या चरावयाला सोडून पीक नष्ट केले. बहुतेक शेतकरी कांदा पिकाला बाजार भाव नसल्यामुळे काढणी करण्याचे काम थांबवले आहे. पीक काढणीला आले मात्र बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट मातीत गेले आहे. ....................................................माझा दीड एकर शेतात कांदा पीक होते. मागील महिनाभरापासून बाजारभावात सुधारणा झाली नाही. शेतीची मशागत, कांदा रोपे लागवड, खुरपणी, औषधे फवारणी यामध्ये ७० हजार रुपये पाण्यात गेले आहे. तसेच पिकांची काढणी,भरणी, वाहतुक त्यातच बाजार भाव नसल्यामुळे हा खर्च पुन्हा तोट्याचा ठरणार आहे. मागील वर्षी १५ ते २० रुपये किलो बाजारभाव मिळाला होता. सध्या किलोला ५ ते ६ रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आज दिड एकर क्षेत्रावर शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.विजय काशिद, शेतकरी 

टॅग्स :KhedखेडonionकांदाGovernmentसरकार