शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भिगवण परिसरात खते विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून युरिया वाटपाबाबत शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:19 IST

भिगवण परिसरातील खते विक्री करणाऱ्या काही दुकानदारांकडून युरियाबाबत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देजादा दर देणाऱ्या शेतकऱ्याला गुपचूप युरिया दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोपभिगवण परिसरातील खत दुकानात विक्री करण्यात येणाऱ्या खतांच्या किमतीही तपासण्याची गरज

भिगवण : भिगवण परिसरातील खते विक्री करणाऱ्या काही दुकानदारांकडून युरियाबाबत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. जादा दर देणाऱ्या शेतकऱ्याला गुपचूप युरिया दिला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकाराकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि पोषक हवामानामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू आणि हरभरासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत. या पिकांच्या खुरपण्या झाल्यामुळे गहू आणि हरभरा पोसण्यासाठी युरिया या रासायनिक खताचा डोस देण्यासाठी शेतकरी भिगवणच्या खत विक्री करणाऱ्या दुकानाकडे फिरत आहेत. मात्र, काही दुकानदार युरियासोबत इतर खते घेतली तरच युरिया दिला जाईल, अशी भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. या खत दुकानदारावर नियंत्रण ठेवणारे कृषी खाते दुकानदाराच्या बचावाचा प्रयत्न करीत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे सरकारच्या जाहिरातीत दाखविले जाणारे अमर्यादित अनुदानित खत कुठे जात आहे? असा सवाल येथील शेतकरी  करीत आहेत, तर गोडाऊनमध्ये युरियाचा भरमसाट साठा असूनही शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अशा दुकानदार यांच्यावर कारवाई होण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. भिगवण परिसरात असणाऱ्या खत दुकानात विक्री करण्यात येणाऱ्या खतांच्या किमतीही तपासण्याची गरज आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे