शेतकरी, कृषी विभाग खरिपासाठी सज्ज

By Admin | Updated: May 20, 2015 23:09 IST2015-05-20T23:09:41+5:302015-05-20T23:09:41+5:30

जिल्हा प्रशासनाने आदेश देताच खरीप हंगामाच्या नियोजनास तालुक्यांतील कृषी विभाग व शेतकरी तयारीसाठी सज्ज झाला आहे.

Farmers, Agriculture Department ready for Kharif | शेतकरी, कृषी विभाग खरिपासाठी सज्ज

शेतकरी, कृषी विभाग खरिपासाठी सज्ज

जिल्हा प्रशासनाने आदेश देताच खरीप हंगामाच्या नियोजनास तालुक्यांतील कृषी विभाग व शेतकरी तयारीसाठी सज्ज झाला आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घोंगडी बैठका सुरू झाल्या आहेत. पूर्वमशागत उरकण्यासाठी शेतकऱ्यांचीही लगबग दिसू लागली आहे. योग्य नियोजन करून शेतीमधून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खत मिळणार बांधावर
४शेतकऱ्यांनी गटशेती करावी यासाठी शासनाकडून या वर्षीही बांधावर खतपुरवठ्याची योजना राबविली आहे. गटातील शेतकऱ्यांनी दहा टन खताची एकत्रित मागणी केल्यास शासकीय खर्चातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत खतांच्या गोणी पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी गटाने एमएआयडीसी या नावाने डिमांड ड्राफ्ट काढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वैयक्तिकरीत्या खते व बियाणे नजीकच्या शासनमान्य खते व बियाणेविक्री दुकानात (कृषिसेवा केंद्रात) शासकीय अनुदानाच्या दरातच मिळतील. त्यासाठीची मागणी नोंदणी सुरू आहे. आवश्यक जादाचे बियाणे लवकरच उपलब्ध होणार असल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे.

तालुकानिहाय बैठका
२१ मे : हवेली, पुरंदर,
२२ मे : मुळशी, मावळ,
२६ मे- वेल्हा, भोर,
२७ मे : शिरुर, खेड,
२८ मे : आंबेगाव, जुन्नर,
२९ मे : बारामती, इंदापूर आणि
३० मे : दौंड.

खतमागणी (टन)
युरिया७१२६५
एम.ओ.पी१२५0६
एस.एस.पी२0६0२
१५.१५.१५ ४६७४
२०.२०.२०७१0२
१२.३२.१६५८६१
१८.४६.०0२0४७४
१०.२६.२६१८६६८
एकूण१८0000

२0१४-१५ चे साध्य
गेल्यावर्षी २ लाख ९८ हजार ८00 हेक्टरवर नियोजन केले होते. यात १३,४0७३ हेक्टरवर पेरणे करण्यात आली होती. त्याची टक्केवाररी ५८ टक्के होती.
४मका : ४३ टक्के वाढ
४सायाबीन: ३१३ टक्के वाढ

यंदा भाताचे क्षेत्र वाढणार
जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा भाताचे ११ हजार ७५३ हेक्टर क्षेत्र वाढणार आहे. गेल्या वर्षी ५५,५३१ हेक्टवर भातलागवड केली होती. यंदा ६७ हजार २८४ हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात ६२ हजार ३00 हेक्टर क्षेत्र हे भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. त्याची सरासरी १५५0 किलो उत्पादकता असते. गेल्या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच भातउत्पादकांची निराशा केली होती. वर्षभर विविध रोगांचा सामना करीत कसेबसे पीक जगवले होते. शेवटी भरलेला दाणाही अवकाळी पावसाने शेतातच पडून गेला होता. त्यामुळे ५५ हजार ५३१ हेक्टरवर लागवड होऊन ९५ हजार ४४७ मे.टन उत्पादन मिळाले होते. मात्र त्याची सरासरीपेक्षा उत्पादकता जास्त म्हणजे १७१९ किलो (हेक्टरला) होती. यंदा ६७ हजार २८४ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असून यातून १ लाख २१ हजार ४३0 मे. टन उत्पादन घेण्याचे नियोजन आहे.

Web Title: Farmers, Agriculture Department ready for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.