शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६ गावात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचा कर्जमाफी योजनेला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:51 IST

आतापर्यंत ४० हजार ९१७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना तब्बल १२०० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार

पुणे : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जोरदार अंमलबजावणीजिल्ह्यात सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली आहे. या गावांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देताना अडथळा निर्माण झाली असून, ही सहा गावे वगळून अन्य गावांना पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील मुर्डी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोवावाडी ग्रामपंचायती मधील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात जाहीर होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.     राज्यसह जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शुक्रवार (दि.२८) पासून शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील अन्य सर्व गावांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना तब्बल १२०० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांत गावागावांमध्ये दिवस-रात्र कर्जमाफी योजनेचे काम सुरू आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आणि त्यानंतर कर्जमाफीचे खाते प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ९१७ शेतकऱ्यांची बँक खाती प्रमाणीकरण करून झाली असून, येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.     जिल्ह्यात बारामती तालुक्यातील मुर्डी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोवावाडी ग्रामपंचायतीसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ३० मार्चला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या या गावांमध्ये निवडणूक आयारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता असलेल्या भागात कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ देता येत नाही. त्यानुसार या गावांमध्ये आता कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागले. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिसऱ्या यादीमध्ये या सहा गावांतील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक