कुंजीरमळ्यात बिबट्याच्या हल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:12 IST2021-05-12T04:12:37+5:302021-05-12T04:12:37+5:30
गोविंद कुंजीर हे त्यांच्या उसाच्या शेतात उसाला बारे देण्यासाठी सकाळी निघाले होते. बारे देण्यासाठी शेतात चालले असताना अचानक ...

कुंजीरमळ्यात बिबट्याच्या हल्यात शेतकरी जखमी
गोविंद कुंजीर हे त्यांच्या उसाच्या शेतात उसाला बारे देण्यासाठी सकाळी निघाले होते. बारे देण्यासाठी शेतात चालले असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला बिबट्याने पंजा मारल्यामुळे खरचटले आहे. ते खाली पडले व जोरात ओरडल्यावरही बिबट्याने परत फिरून त्यांच्यावर पाठीमागून हल्ला करुन शर्टावर पंजा मारल्याने त्यांचा शर्ट फाटला. या घटनेनंतर बिबट्या परत उसात पळून गेला. येथील लोकांनी लगेच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. वनपाल वीर मॅडम, वनरक्षक जे. टी. भंडलकर, सिध्दार्थ नायकोडी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. गोविंद कुंजीर यांना प्राथमिक उपचारासाठी बेल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या ठिकाणी लगेचच पिंजरा लावण्यात आला आहे.
फोटो : बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले गोविंद कुंजीर.