शेतक:यांचे डोळे आकाशाकडे

By Admin | Updated: July 5, 2014 22:19 IST2014-07-05T22:19:00+5:302014-07-05T22:19:00+5:30

राजगुरुनगर : 1972च्या दुष्काळापेक्षाही सध्याची परिस्थिती भीषण असल्याचे खेड तालुक्यातील जुनी जाणती माणसे सांगत आहेत.

Farmer: His eyes are in the sky | शेतक:यांचे डोळे आकाशाकडे

शेतक:यांचे डोळे आकाशाकडे

राजगुरुनगर : 1972च्या दुष्काळापेक्षाही सध्याची परिस्थिती भीषण असल्याचे खेड तालुक्यातील जुनी जाणती माणसे सांगत आहेत. खरिपाच्या पेरण्या होण्याची चिन्हे तर  दिसत नाहीच; पण पावसाची मृग आणि आद्र्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने, माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणीही उपलब्ध होणार की नाही, ही शंका आता भेडसावू लागली आहे. तालुक्यात सध्या सहा टँकरने 6 गावे आणि 77 वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा चालू आहे. आकाशातून आषाढधारा बरसण्याऐवजी त्या शेतक:यांच्या डोळ्यांतून बरसाव्यात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात 57 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. त्यातल्या अवघ्या 12क्क् हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. आजर्पयतची ही सर्वात नीचांकी आकडेवारी आहे.  1972 मध्ये झालेल्या दुष्काळात वळवाचे पाऊस पडले होते. त्यामुळे पेरण्या झाल्या होत्या. पण, पुढे पुरेसा पाऊस न झाल्याने तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  मात्र, पेरण्याच न होण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे जाणकार सांगतात. कितीही दुष्काळ पडला तरी तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागात पाऊस होतोच. यंदा मात्र तिथेही पाऊस नाही हे कटू वास्तव आहे. पाऊस कमी-जास्त झाला तरी भातरोपेच उगवली नाही अशी परिस्थिती  पहिल्यांदाच उद्भवल्याचे शेतकरी सांगतात.
 कडधान्याच्या पेरण्यांचा हंगाम तर निघूनच गेला आहे. भाताच्या लागवडी जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून सुरू होतात. त्या यंदा झाल्याच नाहीत. भातरोपे वाया गेली असून, बाहेरचे पाणी देऊन ज्यांनी कशीबशी जी रोपे जगविली आहेत, ती खाचरात पाणीच नसल्याने लावू शकत नाही.  नवीन रोपे टाकून ती उगवण्याची वाट पाहणो आता शक्य नाही. कारण, रोपे लागवडीयोग्य होण्यास 22 दिवसांचा किमान कालावधी लागतो. तो मिळणो आता शक्य नाही. या सर्व परिस्थितीचा सार असा आहे की खेड तालुक्यात तरी आता कडधान्ये, भात ही पूर्णपणो हातातून गेली आहेत. या आठवडय़ात पाऊस झाला नाही, तर बाजरी आणि भुईमुगाची पेरही शक्य होणार नसल्याने त्या पिकांचीही हातात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
 
जनावरे जगविणो कठीण
4तालुक्यात जुलै महिन्यातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची गेल्या कित्येक वर्षातली ही पहिलीच वेळ आहे. हा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पाणी मिळत असले तरी, भविष्यात तेही उपलब्ध होईल की नाही अशी शंका आहे. पेरण्या तर नाहीतच, पण डोंगरावर किंवा माळावरचे गवतही यावर्षी उगवलेले नसल्याने जनावरे जगविणो कठीण होणार आहे. 
4तालुक्याची मुख्य खरीप पिके असलेली बाजरी आणि भुईमूग या पिकांच्या पेरण्या उशिरात उशिरा 15 जुलैर्पयत होऊ शकतात. त्यानंतर ही पिके पेरली जाऊ शकणार नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी सांगितले.

 

Web Title: Farmer: His eyes are in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.