शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: वेल्हे तालुक्यात शेताच्या वादातून शेतकरी भावानेच केला भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:52 IST

हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील सोंडे माथना येथील किसन निवृ्ती किन्हाळे (वय 50,राहणार सोंडे माथना) शेतक-याचा शेताच्या वादातून खून झाला असून विनायक रामदास किन्हाळे (वय 39,राहणार सोंडे माथना) यास अटक करण्यात आल्याची माहिती वेल्हे पोलीसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंडे माथना येथील शेतकरी किसन निवृ्ती किन्हाळे (वय 50) हा गुंजवणी नदीच्या तिरावरुरन घरी परतत असताना विनायक किन्हाळे यांनी त्यांच्यावर लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. जखमी झाल्याने त्यास भोर तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार करण्यापुर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॅाक्टरांनी सांगितले,याप्रकरणी वेल्हे पोलीसांनी  विनायक रामदास किन्हाळे (वय 39) यास अटक केली असुन भादवी 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

किसन निवृ्ती किन्हाळे हे तंटामुक्त गाव समिती सोंडेमाथना चे अध्यक्ष होते,तर तोरणासागर विद्यालय निवीचे प्राचार्य मोहन किन्हाळे यांचे ते भाऊ आहेत. गेल्या दिवसापासून किन्हाळे भाऊकीचा आपआपसात वाद होता. सोंडे माथना परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदाम बांदल,औंदुबर आडवाल,विशाल मोरे,अभय बर्गे अजय साळुंखे,यांचे पथक गावात गस्त घालत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. व परिस्थितीची पाहणी केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :bhor-acभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक