८२ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST2021-06-03T04:08:30+5:302021-06-03T04:08:30+5:30

पुणे : शहर पोलीस दलातून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितीत एका समारंभात ...

Farewell to 82 police officers and employees | ८२ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून निरोप

८२ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून निरोप

पुणे : शहर पोलीस दलातून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितीत एका समारंभात निरोप देण्यात आला. या वेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, मितेश घट्टे उपस्थित होते.

पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याहस्ते निवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी गुप्ता यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या कालावधीत ५ अधिकारी व १८ अंमलदार निवृत्त झाले. तर ३१ मे रोजी ५८ पोलीस अंमलदार, ४ सहायक पोलीस आयुक्त, १ पोलीस निरीक्षक,२ सहायक पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक असे मिळून ८२ पोलीस निवृत्त झाले. त्यांनी पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल गुप्ता यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Farewell to 82 police officers and employees