शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

प्रसिद्ध कामशास्त्र तज्ज्ञ डॉ. शशांक सामक यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 11:37 IST

कामशास्त्र हा एक अवघड पण समाजाच्या प्रबोधनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय ते अतिशय सुगम, रंजक तसेच शास्त्रीय पद्धतीने मांडत.

ठळक मुद्देचाळीशी नंतरचे कामजीवन हा त्यांचा अतिशय गाजलेला होता कार्यक्रम

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध कामशास्त्र तज्ज्ञ डॉ. शशांक दत्तात्रय सामक (वय ६५ वर्षे) यांचे आज (१५ मे रोजी) हृदयाच्या तीव्र धक्क्यााने अकस्मात निधन झाले. डॉ. सामक यांचे नाव त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक योगदानामुळे पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 'वैद्यकीय कामशास्त्र' हा त्यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या खेरीज अनेक शोधनिबंध, विपुल लिखाण त्यांनी केले. कामशास्त्र हा एक अवघड पण समाजाच्या प्रबोधनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय ते आपल्या व्याख्यानातून अतिशय सुगम, रंजक तसेच शास्त्रीय पद्धतीने मांडत.चाळीशी नंतरचे कामजीवन हा त्यांचा अतिशय गाजलेला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र भर लोकप्रिय प्रयोग वारंवार होत. अतिशय हुशार,  मेहनती आणि रसिक अशा डॉ. सामक यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यातील बी जे मेडिकल येथे झाले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी (जेसिका),  मुलगी (रसिका),  नातू (ईशान) मुलगा (मिहीर) आणि वयोवृद्ध आई वडील आहेत. मोठा मित्र परिवार आणि लोकसंग्रह असलेल्या डॉ. सामक यांच्या निधनाने सर्वत्र शोकाचे वातावरण होते. मुलगा परदेशातून येऊ शकत नसल्याने त्यांची मुलगी, रसिका हिने वडिलांचे अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :PuneपुणेSex Lifeलैंगिक जीवनDeathमृत्यू