शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

पुण्यातील या जिम वाढवत आहेत पुणेकरांचा फीटनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:57 IST

पुण्यातील काही फिटनेस क्लब आणि जिम सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांसहीत मोठीशी सवलतही देऊ करताहेत.

ठळक मुद्देपुण्यात कसलीच कमी नसते हे ऐकलंय ना. हो खरंच आहे ते.पुण्यात मुंबईप्रमाणेच आधुनिक जिम आणि फिटनेस क्लब आहेत, जे पुणेकरांना आरोग्य देऊ करताहेत.

पुणे : दिवसभर काम करायचं म्हणजे तेवढी शक्ती आपल्या शरीरात हवी. त्यासाठी व्यायाम हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. नियमित घरच्या घरी व्यायाम करण्याचा विचार प्रत्येकजण करतो, मात्र ते कोणाकडून होत नाही. मग त्यासाठी जिमचा रस्ता धरला जातो. एकदम ब्रँडेड गोष्टींची सवय लागलेल्या तरुणाईला जिमही अशीच मोठी, प्रशस्त आणि आधुनिक सोय-सुविधांनी सज्ज हवी असते. कोणत्या जिममध्ये कसं ट्रेन केलं जातं? ट्रेनर कसे असतात? या सगळ्यांची माहिती तरुणाई शोधत असते. पुण्यातील अशाच काही प्रसिद्ध जिमविषयी आज आपण पाहुया. 

इम्पल्स फिटनेस

पुण्यात महिलांसाठी जिम पाहत असाल तर इम्पल्स फिटनेस सेंटर हा उत्तम पर्याय आहे. महिलांसाठी इकडे खास वेगळी जागा करून देण्यात आली आहे. महिलांसाठी स्पेशल ट्रेनरही इकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांच्या आरोग्याची इकडे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे पुरुषांनाही इकडे योग्यप्रकारे ट्रेन केलं जातं. कोंढवा तालुक्यात असलेल्या या जिममध्ये सगळी साधनं इकडे उपलब्ध असल्याने अनेकजण इकडे येत असतात. जिम, कार्डिओ, योगा, झुंबा आणि स्टीम अशा विविध सुविधाही इकडे उपलब्ध आहेत. 

डॉटफिट फिटनेस

तुम्ही जर स्वत:च्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी उत्तम ट्रेनिंगच्या शोधात असाल तर पुण्यातील बाणेर येथील बालेवाडी फाट्यावर असलेल्या डॉटफिट फिटनेसचा तुम्ही विचार करू शकता. तुमच्या शरीराला नक्की काय हवंय, सदृढ शरीरासाठी तुम्ही अजून काय करायला हवं याविषयावर योग्य ट्रेन इकडे केलं जातं. पॉवर झुम्बा, आहारविषयक माहिती, एरोबिक्स अशा जास्तीच्या सुविधा इकडे देण्यात येतात. अगदी वैयक्तिक मार्गदर्शनही इकडे केलं जातं, त्यामुळे तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इकडे मिळू शकतील. 

युअर फिटनेस क्लब

तुम्ही कधी ‘क्राव्ह मॅगा टू बॅलिस्टीक केटलबेल’ विषयी कधी ऐकलं आहे का? सध्या हा जिममध्ये हा प्रकार फार ट्रेंडिंग आहे. भारतात अजूनही कित्येक जिममध्ये हा प्रकार उपलब्ध नाहीए. मात्र पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या युअर फिटनेस क्लबमध्ये या प्रकारची ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता. एकंदरीत आपल्या शरीराला ज्या ज्या व्यायामांची आवश्यकता असते, त्या साऱ्याची पुर्तता या एका प्ररकारात केली जाते. स्टिम आणि मालिश यासांरख्या सुविधाही या क्लबमध्ये आहेत. तसंच इकडे विविध मेंमबरशिपच्या संकल्पनाही आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये इकडे ट्रेनिंग घेऊ शकता.

गोल्ड जिम

बुधवार पेठेतील गोल्ड जिम संपूर्ण पुण्यात फार प्रसिद्ध आहे. गोल्ड जिमच्या अनेक शाखा देशभर पसरलेल्या आहेत. त्यामुळे या जिमला राष्ट्रीय दर्जा मिळालाय. तुमच्या फिटनेससाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या जिममध्ये उपलब्ध आहे. मुळात इडकच्या एक्सपर्ट ट्रेनर्समुळे हे जिम फार प्रसिद्ध आहे. तसंच सगळ्या सुविधा, साधनं या जिममध्ये असल्याने पुण्यातील तरुण याच जिमचा जास्त विचार करतात. बेस्ट फिटनेस चेन हा पुरस्कारही गोल्ड जिमला मिळालेला आहे. 

रॉयल फिटनेस क्लब

तुम्हाला सायकलिंगची आवड असेल तर रॉयल फिटनेस क्लब तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. कारण इकडे स्पिनिंग आणि सायकलिंगच्या माध्यमातून उत्तम ट्रेन केलं जातं. नर्हेतील नेवळे ब्रिजजवळ असलेल्या विश्वा आकेर्डमध्ये हे जिम सेंटर आहे. किक बॉक्सिंग, अक्वा झुंबा, अक्वा स्पिनिंग अशा सुविधाही इकडे पुरवल्या जातात. तसेच विविध इक्विपमेंट्सही इकडे असल्याने चांगल्या दर्जाची ट्रेनिंग तुम्हाला इकडे मिळू शकते. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य