शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 18:06 IST

 आळंदी मंदिर परिसरात विस्मरणातुन फिरत असताना गुरुवारी आढळून आलेल्या जेष्ठ नागरिक सुद्धा परब यांना रडत असताना येथील नागरिकांना मला घरी घेऊन चला असे म्हणत होत्या

ठळक मुद्देबांद्रा येथून त्या एकट्याच घरातून बाहेर पडल्या होत्या.या संदर्भात सोशल मीडियावर गेले दोन दिवस फिरत फिरत बांद्रा येथे मुलीपर्यंत पोहोचली

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत फिरत असताना आढळून आलेल्या विस्मरणामुळे जेष्ठ नागरिक सुधा सहदेव परब (वय ८०) रा.देवळी खालची जिल्हा रत्नागिरी यांना अखेर नातेवाईकांचे ताब्यात रविवारी (दि.१४) देण्यात आले.आळंदी येथील मंदिराबाहेर गुरुवारी (दि,११) रात्री रडताना कमला महादेव चव्हाण असे नाव सांगणा-या जेष्ठ नागरिक आजींना सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून आळंदी पोलीस ठाण्यात सुपूर्द  करण्यात आले. त्यानंतर आळंदी पोलिसां मार्फत किनारा वृद्धाश्रम अहिरवडे कामशेत येथे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात सोशल मीडियावर गेले दोन दिवस पोस्ट अनेक ग्रुपवर व्हाट्सअप वर फिरत फिरत बांद्रा येथे रहात असणाऱ्या त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचली. आजींचे नाव सुधा सहदेव परब असे मिळून आले. मात्र आजींचे विस्मरणामुळे तेही त्यांनी आळंदीत चुकीचे सांगितले होते. बांद्रा येथून त्या एकट्याच घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या आळंदीला कशा पोहोचल्या हे समजले नाही. मंदिर परिसरात विस्मरणातुन फिरत असताना गुरुवारी आढळून आलेल्या जेष्ठ नागरिक सुद्धा परब यांना रडत असताना येथील नागरिकांना मला घरी घेऊन चला असे म्हणत होत्या.यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे यांनी त्यांना आळंदी पोलीस ठाण्यात पोच केले.यावेळी त्यांचे समवेत भाईचारा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुलतान शेख,ठाणे अंमलदार नितीन बनकर आदी उपस्थित होते. त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना वृद्धाश्रमात पोच करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम चिंबळी येथे मदर तेरेसा वृद्ध आश्रमात वय जास्त असलेने घेण्यात आले नाही. त्यानंतर त्यांना परत आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील कान्हे फाटा कामशेत अहिरवडे किनारा वृद्धाश्रमात संचालिका  प्रीती वैद्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.  रविवारी (दि.१४) दुपारी दोनचे सुमारास अहिरवडे कामशेत (ता.वडगाव मावळ) येथून संचालिका श्रीमती प्रीती वैद्य यांनी परब ह्या आजीस त्यांच्या मुलीकडे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या सोबत मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदिप शिर्के,राजेंद्र नाईक, भगवान परब यांच्या समक्ष त्यांना त्यांच्या मुलीकडे सुपूर्द करण्यात आले.यासाठी मुंबई वरून शिवसेना प्रतिनिधी उदय दळवी यांनी देखील संपर्क करुन सहकार्य केले . सोशल मीडियावर फिरलेल्या संदेशाने जेष्ठ नागरिक आजीस मुलीला पुन्हा भेटण्यास मदत झाली.

टॅग्स :AlandiआळंदीWomenमहिला