नसरापूर : भोर तालुक्यातील केतकावणे येथे पत्नीच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकल्याच्या संशयावरून बुधवारी (दि.२३) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तीन युवकांनी कुटुंबावर कोयत्याने वार करत हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सुरज अरुण दिघे (वय २४) याने आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विशाल उर्फ तानाजी दत्तात्रय दिघे (रा. केतकावणे, ता. भोर ), वैभव थिटे (रा. हातवे, ता. भोर ) व एका अज्ञात युवकां विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपी विशाल उर्फ तानाजी दिघे याने पत्नीला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने सुरजसह कुटुंबातील आई, भाऊ यांच्यावर हल्ला करण्यात केला. त्यानंतर आरोपीच्या सोबत आलेल्यांनी फिर्यादीच्या आई व भावावर देखील वार करत जखमी करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांनी केलेला आरडाओरडा ऐकून रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, आरोपी गावकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवत दुचाकीवरून फरार झाले. या प्राणघातक हल्ल्यामध्ये अरूण दिघे बरोबरच शुभम अरुण दिघे (वय २१), छाया अरुण दिघे (वय ४५) हे जखमी झाले आहेत. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन तलबार करत आहे.
पत्नीला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 16:52 IST
पत्नीला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे.
पत्नीला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला
ठळक मुद्देआरोपी गावकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवत दुचाकीवरून फरार