शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

भोरवासीयांना चिखल व गाळमिश्रित अशुद्ध पाणी

By admin | Updated: June 24, 2015 05:10 IST

तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणातील पाणी गढूळ झाले असून, फिल्टर नादुरुस्त असल्याने संपूर्ण भोर

भोर : तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणातील पाणी गढूळ झाले असून, फिल्टर नादुरुस्त असल्याने संपूर्ण भोर शहराला दोन दिवसांपासून ते प्यावे लागत आहे. पावसाळयापूर्वी भोर नगरपलिकेने फिल्टरची दुरुस्ती केली नाही, तर भोरवासीयांना चिखल व गाळमिश्रित अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.भोर नगरपलिकेचा मागील दोन वर्षांपूर्वी केलेला पाणी शुद्ध करण्याचा नवीन (फिल्टर प्लांट) सुरू आहे. मात्र, जुन्या फिल्टरला वाळू नाही. पाईप खराब झाले असून ब्लीचिंग पावडरचा अभाव, घाण, कचरा यांमुळे फिल्टर जाम झाला असल्याने तो बंद आहे. त्यामुळे २५ टक्के शहराला फिल्टरने शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सदर फिल्टरचे पाणी शहराला फिरवल्याने एका फिल्टरने पाणी शुद्ध होत नसल्यामुळे संपूर्ण भोर शहराला गाळमिश्रित गढूळ पाणी येत आहे. याशिवाय, शहरातील शंकर हिल येथे नवीन १५ लाख लिटरची, एक ७ लाख लिटरची, २ चार लाख लिटरच्या जमिनीवरच्या तर पेशवाई हॉटेलजवळ एक लाख व स्वामी समर्थ मंदिराजवळ ४ लाख लिटरच्या उंचावरच्या अशा एकूण २५ लाख लिटर पाणी साठविण्यासाठी टाक्या आहेत. २०१२मध्ये झालेल्या नवन्ीा फिल्टरवरून शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. भोर शहराला दररोज सुमारे २५ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, एक फिल्टर नादुरुस्त असल्याने एकाच फिल्टरवरून ८ ते १० लाख लिटरच शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने २५ टक्केच शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो, तर ७५ टक्के शहराला अशुद्ध पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे.