भुरट्या चोरांनी ‘उडविले’ पालिकेचे फ्यूज
By Admin | Updated: May 13, 2014 02:03 IST2014-05-13T01:52:50+5:302014-05-13T02:03:17+5:30
भुरट्या चोरांकडून पथदिव्यांच्या फ्यूजवर हात साफ करण्याचा पराक्रम शहरात सुरू आहे.

भुरट्या चोरांनी ‘उडविले’ पालिकेचे फ्यूज
सुनील राऊत , पुणे
भुरट्या चोरांकडून पथदिव्यांच्या फ्यूजवर हात साफ करण्याचा पराक्रम शहरात सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून, या चोर्या रोखण्यात अपयश येत असल्याने महापालिका प्रशासनही हतबल झाले आहे. विशेष म्हणजे चोर फ्यूजसोबत दिव्यांचा वीजपुरवठा नियंत्रित ठेवण्यासाठी खांबांवर बसविलेले जंक्शन बॉक्स आणि दिव्यांसाठीच्या कॉपरवायरही लंपास करीत आहेत. त्यामुळे पथदिवे कार्यरत ठेवण्यासाठी पालिकेस मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.