प्रवेशाच्या बहाण्याने फसवणारे गजाआड
By Admin | Updated: December 24, 2016 00:48 IST2016-12-24T00:48:37+5:302016-12-24T00:48:37+5:30
मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने गुजरातमधील व्यावसायिकाला साडेदहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी

प्रवेशाच्या बहाण्याने फसवणारे गजाआड
पुणे : मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने गुजरातमधील व्यावसायिकाला साडेदहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार कात्रज परिसरामध्ये घडला.
नरेंद्र बच्चुभाई विरडीया (वय ५४, रा. पंचवटी सोसायटी, धनकवडी) आणि दीपक कुमार चोबे (वय ४७, रा. अंधेरी इस्ट, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनोद पटोलिया (वय ४६, रा. राजकोट) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटोलिया हे गुजरातमध्ये व्यवसाय करतात. त्यांच्या मुलाला पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. पटोलिया यांचा नातेवाईक असलेल्या नरेंद्र याने हा प्रवेश मिळू शकतो असे सांगत काही एजंटशी संपक साधून दिला. त्यांच्याकडून विरडीया व इतर आरोपींनी साडेदहा लाख रुपये घेतले. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश दिला नाही.
प्रवेश न मिळाल्याने त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली असता आरोपींनी त्यांना केवळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेली. शेवटी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विरडीया व चोबे यांना अटक केली आहे.उपनिरीक्षक व्ही. बी. जगताप पुढील तपास करत आहेत. (प्रतिनिधी)