शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

‘बालगंधर्व’बाबत विरोधकांचा दावा खोटा- मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 03:53 IST

तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराबाबत महापालिकेने पाडून विकास करणे किंवा आहे तसेच ठेवून सुधारणा करणे असे दोन प्रकारचे आराखडे मागवले आहेत. त्यावर तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. त्यांनीच समितीचे अध्यक्ष असताना सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकात बालगंधर्वच्या नूतनीकरणासाठी आर्थिक तरतूद केली आहे.पुण्यातील या महत्त्वाच्या वास्तूमध्येही विरोधक राजकारण पाहत आहे ही खेदाची गोष्ट आहे, असे नमूद करून मोहोळ म्हणाले, महापालिका आयुक्तांच्या जाहीर प्रकटनात जी गोष्ट उघड आहे ती लपवून ठेवून विरोधक बोलत आहेत. बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. मात्र आता इतक्या वर्षांनंतर त्यात काही काम करणे आवश्यक आहे. त्यासाठीच दोन्ही प्रकारचे आराखडे मागवण्यात आले आहेत. त्यावर निर्णय घेण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येईल. त्यात अर्थातच ज्येष्ठ नाट्यकर्मींचाही समावेश असेल. ही समितीच याबाबतचा अंतिम निर्णय घेईल.मेट्रोसाठी म्हणून बालगंधर्व पाडण्याचा प्रश्नच येत नाही, मात्र तरीही विरोधक तसा दावा करीत आहेत याचे कारण मेट्रोचे काम वेगात सुरू आहे याची त्यांना राजकीय भीती बसली आहे. निवडणुकीत मेट्रोचे काम आपल्याला अडचणीचे ठरणार याची खात्री वाटत असल्याने हे काम त्यांना थांबवायचे आहे. त्यासाठीच बालगंधर्व रंगमंदिर व मेट्रोची सांगड घालण्यात येत असल्याची टीका मोहोळ यांनी केली.

टॅग्स :Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिका