खोट्या बुकिंगद्वारे ८९ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 04:32 IST2015-08-23T04:32:23+5:302015-08-23T04:32:23+5:30
एक्सपोर्ट शिपमेंटच्या व्यवसायासाठी इंटरजास लॉजिस्टिक कंपनीकडे खोटा एक्स्पोर्टर दाखवून खोटे बुकिंग घेऊन कंपनीची ८९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला विमानतळ

खोट्या बुकिंगद्वारे ८९ लाखांचा गंडा
पुणे : एक्सपोर्ट शिपमेंटच्या व्यवसायासाठी इंटरजास लॉजिस्टिक कंपनीकडे खोटा एक्स्पोर्टर दाखवून खोटे बुकिंग घेऊन कंपनीची ८९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी यापूर्वी दोघांना अटक केली आहे. अन्य तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. प्रणव रजनीकांत पटेल (वय ३६, रा. गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. राहुल दिलीप लभडे (वय २४, रा. सिडको, नाशिक), किरण दलिचंद पारख (वय ३५, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांना यापूर्वी अटक केली होती.
नितीन नारायण परब (वय ३७, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. परब यांची विमाननगर येथे इंटरजास लॉजिस्टीक नावाची कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय इंटरनॅशनल भाडे फॉरवर्डिंग व त्यामध्ये सामानाची, वस्तूंची ने-आण, इम्पोर्ट एक्सपोर्ट ही भाडेतत्त्वावर विमानाने वा समुद्राने जगातील विविध ठिकाणी पोहोचिवण्याचे काम करते. या कंपनीचे जुलै २०१४ ते १० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परब यांच्या कंपनीने इम्पोर्ट-एक्सपोर्ट ट्रेडलिंक कंपनीच्या माध्यमातून सौराष्ट्र फ्युअल कंपनी, मुंबई यासाठी ब्लू ओशियन शिपिंग अॅन्ड लॉजिस्टीक कंपनी, अहमदाबाद, गुजरात या कंपनीकडे ६ एक्स्पोर्ट शिपमेंटचा व्यवसाय केला.
खोटे बुकिंग, खोटे बिल आॅफ लॅँडिग खरे भासवून कंपनीची ८९
लाख १८ हजारांची फसवणूक केली. अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.