ट्रकमधून पडणा:या वाळूचा नागरिकांना त्रस
By Admin | Updated: November 12, 2014 00:10 IST2014-11-12T00:10:24+5:302014-11-12T00:10:24+5:30
खच्च भरून असलेल्या ट्रकमधून भर वर्दळीच्या वेळी मागे सांडत जाणा:या वाळू, खडी तसेच बांधकामांच्या राडारोडय़ामुळे वाहनचालकांना त्रस होत

ट्रकमधून पडणा:या वाळूचा नागरिकांना त्रस
पुणो : खच्च भरून असलेल्या ट्रकमधून भर वर्दळीच्या वेळी मागे सांडत जाणा:या वाळू, खडी तसेच बांधकामांच्या राडारोडय़ामुळे वाहनचालकांना त्रस होत असून, पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आर.टी.ओ.) कधीही लक्ष या प्रकारांकडे गेलेले नाही.
क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणा:या वाहनांवर दोन हजार रुपये दंड, किंवा जास्तीच्या प्रत्येक टनासाठी 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय परवाना निलंबनाची कठोर तरतूद परिवहन कायद्यात आहे.
प्रत्यक्षात अवजड वाहनांमधील क्षमतेपेक्षा अधिक भरलेल्या मालामुळे डोळ्यांत माती जाण्यासारखे, रस्त्यावर पडलेले दगड, खडी दुस:या वाहनाच्या टायरमुळे उडून जबर दुखापत होण्यासारखे प्रकार विशेषत: सिंहगड रस्ता, सातारा रस्ता येथे अधिक दिसून येतात. वाळू रिकामी करून परतणा:या मालमोटारींमध्ये शिल्लक असलेली बारीक रेती गळत राहून मागून येणा:या वाहनचालकांना, पादचा:यांच्या डोळ्यांमध्ये जाऊन त्रस होतो. अनेक नागरिकांना अशा प्रकारांमुळे गंभीर दुखापती झाल्याची उदाहरणो आहेत. अशी वाहने जात असताना वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचे दिसून आले असून, आर.टी.ओ.च्या पथकाने कारवाई केल्याचे उदाहरण गेल्या अनेक वर्षामध्ये दिसलेले नाही. आर.टी.ओ.ने दरवर्षीप्रमाणो क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणा:या वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जास्तीचा माल वाहनातून उतरविला जात नाही तोवर वाहनास जागीच अटकाव करण्याचाही इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)