कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST2021-06-30T04:07:54+5:302021-06-30T04:07:54+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस कांदा लिलाव होतात. महिन्याच्या सुरुवातीपासून ...

Falling onion prices | कांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस कांदा लिलाव होतात. महिन्याच्या सुरुवातीपासून ते रविवार (दि. 27) पर्यंत येथे चांगल्या कांद्यास दहा किलोस 230 ते 255 असे दर मिळाले होते. आज मंगळवारी मात्र या दरात घसरण झाली. जवळपास अकरा हजार कांदा गोणी येथे विक्रीस आल्या असल्याचे बाजार समिती सचिव रुपेश कवडे यांनी सांगितले.

परराज्यांतून कांद्यास असलेली मागणी कमी झाल्याने कांदा दर घसरले असल्याचे आडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे व जीवन शिंदे यांनी सांगितले. प्रतवारीप्रमाणे दहा किलो कांद्यास मिळालेले दर याप्रमाणे कांदा नंबर एक 160 ते 215 रुपये, दोन नंबर कांदा 120 ते 160 रुपये, तीन नंबर कांदा 60 ते 120 रुपये.

Web Title: Falling onion prices