कलिंगडाच्या भावात घट; खरबूज, पपईच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:35+5:302021-06-21T04:08:35+5:30

पुणे : रविवारी लिंबे व कलिंगडाच्या भावात घट, तर खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली आहे. अननस, संत्रा, मोसंबी, ...

Fall in watermelon prices; Melon, papaya prices rise | कलिंगडाच्या भावात घट; खरबूज, पपईच्या भावात वाढ

कलिंगडाच्या भावात घट; खरबूज, पपईच्या भावात वाढ

पुणे : रविवारी लिंबे व कलिंगडाच्या भावात घट, तर खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली आहे. अननस, संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू आणि सीताफळाचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

ऊन कमी झाल्यामुळे कलिंगड आणि लिंबांना मागणी घटली. तर भावात वाढ झाली आहे. खरबूज व पपईची आवक घटल्याने भाव वाढले आहेत.

कलिंगडाच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी तर लिंबाच्या गोणीमागे ७० रुपयांनी घट झाली आहे. तर खरबुजाच्या आणि पपईच्या भावात किलोमागे प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ४ ट्रक, मोसंबी १० ते १५ टन, संत्री १ टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई ५ ते ७ टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू २५० ते ३०० के्रट, चिक्कू दोनशे ते तीनशे बॉक्स खरबुजाची १ ते २ टेम्पो इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :-

लिंबे (प्रति गोणी) : ५०-२००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १५०-६००, (४ डझन) : ६० ते १६०, संत्रा : (१० किलो) : ३००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१००, गणेश : १०-३०, आरक्ता १०-४०. कलिंगड: ५-६, खरबूज : १०-२०, पपई : ७-१२, चिक्कू ( १० किलो) २००-५००, पेरू (२० किलो): २००-३००.

Web Title: Fall in watermelon prices; Melon, papaya prices rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.