बनावट टोल पावत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:48+5:302021-03-04T04:17:48+5:30

: पोलीस अधीक्षकांना निवेदन खेड-शिवापूर: खेड-शिवापूर टोलनाक्यावरील बोगस पावतीप्रकरणी शासनाची मोठी फसवणूक झाली असल्याची शक्यता गृहीत धरून विशेष ...

Fake toll receipts should be investigated through SIT | बनावट टोल पावत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी

बनावट टोल पावत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी

: पोलीस अधीक्षकांना निवेदन

खेड-शिवापूर: खेड-शिवापूर टोलनाक्यावरील बोगस पावतीप्रकरणी शासनाची मोठी फसवणूक झाली असल्याची शक्यता गृहीत धरून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीमार्फत करण्यात आली. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. शिवापूर टोलनाक्यावर बोगस पावत्याचे रॅकेट ग्रामीण पोलिसांनी नुकतेच उघडकीस आणले. कंपनीच्या व टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे कायदेविषयक सल्लागार नितीन दासवडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी बारामती विभागाचे उपअधिक्षक यांची स्वतंत्र तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती शिष्टमंडळास दिली. या प्रकरणी खोलवर जाऊन तपास करणार असून टोलनाक्यावरील बोगस पावती प्रकरणात शासनाची मोठी फसवणूक झाली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

बोगस पावती प्रकरणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांनी टोलचालकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करणे आवश्यक होते मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या (एनएचआय)च्या संचालकांनी या बाबत मौन बाळगले आहे ही बाब अधिक गंभीर आहे, असे मत कृती समिती तर्फे व्यक्त करण्यात येत आहे. शिष्टमंडळात कृती समितीचे पद्माकर कांबळे, सतीश हंचाटे, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.

चौकट

शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती तर्फे या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून केवळ शासनाची नव्हे तर सामान्य वाहन चालकांची लाखो रुपयांची लूट झाली असल्याची शक्यता आहे.

ज्ञानेश्वर दारवटकर,

निमंत्रक, शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती

Web Title: Fake toll receipts should be investigated through SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.