शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दहा तोतया उमेदवारांवर गुन्हा दाखल

By नम्रता फडणीस | Updated: October 14, 2023 18:06 IST

पुणे : पोलिस भरतीसाठी बोगस  प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करीत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिले असल्याचे भासवत पुणे ग्रामीणच्या पोलिस ...

पुणे :पोलिस भरतीसाठी बोगस  प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करीत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिले असल्याचे भासवत पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाची  फसवणूक करणाऱ्या दहा तोतया उमेदवारांविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमिनाथ सुधाकर कंठाळे (बीड), अजय बब्रुवान जरक (सोलापूर), अक्षय बाळासाहेब बडदे (पुणे), दिनेश अर्जुन कांबळे (बीड), राजेश रमेश धुळे (पुणे), अमोल विठ्ठल गरके (नांदेड), ध्रुपद प्रल्हाद खराडे (नांदेड),गोविंद भक्तराज मिटके (नांदेड), आसाराम बाळासाहेब चौरे ( बीड) आणि हेमंत विठ्ठल निकम (पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया उमेदवारांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उप अधीक्षक युवराज मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. दि. 5 जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला.

2021 मध्ये पोलिस शिपाई भरती जाहीर करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयातर्फे ही भरती प्रक्रिया 2023 मध्ये राबविण्यात आली. भरती प्रक्रियेदरम्यान दहा आरोपींनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केली. ही प्रमाणपत्रे त्या त्या जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली. त्यामध्ये बीडच्या जिल्हाधिका-यांनी आम्ही अशी कोणतीही प्रमाणपत्रे दिली नसल्याचे सांगितले. या आरोपींनी 2009 ते 2015 दरम्यान आधीच प्रमाणपत्र काढून ठेवली होती.  त्यांनी बोगस प्रमाणपत्रे तयार करुन पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केले असल्याचे निष्पन्न झाले अशी  माहिती तपास  अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे