बनावट कागदपत्रे; चौकशीचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 2, 2015 03:19 IST2015-03-02T03:19:00+5:302015-03-02T03:19:00+5:30

जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

Fake documents; Filing a complaint | बनावट कागदपत्रे; चौकशीचा गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे; चौकशीचा गुन्हा दाखल

पिंपरी : जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
परमानंद मेहबुमल जमतानी (रा. पिंपरी) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. शरद यशवंत कोकणे (५४, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणे यांची रहाटणी येथे सर्व्हे क्रमांक सहामध्ये ५४ गुंठे जमीन आहे. यावरून गेल्या अनेक दिवसांपासूनदोघांमध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयात २४ जानेवारी आणि १७ नोव्हेंबर २०१४ रोजी जमतानी यांनी जमिनी खरेदीची नोंद व्हावी, यासाठी अर्ज केला होता. दरम्यान याबाबतची माहिती कोकणे यांना माहिती मिळताच त्यांनी तहसील कार्यालयात संबंधित कागदपत्रांची नोंद होऊ नये म्हणून अर्ज केला व संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले. याच कालखंडात कोकणे यांनी ४ फेब्रुवारी २०१५ ला न्यायालयात जमतानी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. त्याची सुनावणी २८ फेब्रुवारीला झाली. त्यात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यानंतर निगडी पोलिसांनी जमतानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खोटी कागदपत्रे सादर करून अप्पर तहसीलदार कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे जमीन खरेदीखत नोंद करण्यासाठी जमतानी यांनी प्रयत्न केल्याचे कोकणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fake documents; Filing a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.