बनावट जातप्रमाणपत्र ; राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा
By Admin | Updated: January 15, 2015 23:41 IST2015-01-15T23:40:43+5:302015-01-15T23:41:25+5:30
पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्रमांक ४३ अ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

बनावट जातप्रमाणपत्र ; राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा
पुणे : पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्रमांक ४३ अ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण मदन टाक (रा. सुभाषनगर, रिव्हर जवळ, झुलेलाल घाट, पिंपरी) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
याप्रकरणी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक तीनचे पोलीस निरीक्षक कारभारी हांडोरे यांनी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एन. एफ. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाक हे पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक ४३ अ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवीत आहेत. हा प्रभात ओबीसी राखीव असल्यामुळे टाक यांनी निवडणूक अधिका-यांकडे सादर केलेल्या कागदपत्रांसोबत जात पडताळणी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र जोडले होते. या प्रमाणपत्रावर ०७३९२७ हा क्रमांक होता. (वार्ताहर)