शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस पूर्व परीक्षेच्या ऑनलाइन परीक्षेत बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र (सीआयएसी) मधील परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा शनिवारी (दि. ...

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र (सीआयएसी) मधील परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा शनिवारी (दि. २०) ऑनलाइन घेण्यात आली. मात्र परीक्षेत झालेल्या तांत्रिक बिघाडीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी दोन तासांऐवजी चार तास लागल्याने चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे.

वेळापत्रकानुसार शनिवारी (दि. २०) सकाळी ११ ते १ या वेळेत होणार होती. तशी ती परीक्षा सुरू ही झाली. मात्र अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामध्ये परीक्षेचा बराच वेळ वाया गेला. त्या वेळेत परीक्षा देता येणं शक्य झाले नाही. त्यामुळे पुन्हा वेळ वाढवून दिल्याचा मेसेज विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाने पाठविला. त्यानुसार २ वाजता परीक्षेसाठी लॉगिन केले. परीक्षा सुरू झाली, मात्र काही वेळातच पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे पेपरचा वेळ संपला तरी संपूर्ण पेपर सोडवता आला नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच उमेदवारांना या ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागले आहे. काही जणांनी परीक्षा दिली, काही जणांना परीक्षा देत असताना प्रश्नांमध्ये अडचणी आल्या, काहींची प्रक्रिया चालू झाली नाही.

त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी.

अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

चौकट

यूपीएससी-नागरी सेवा परीक्षा २०२१च्या पूर्व तयारीसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन परीक्षा राज्यात औरंगाबादसह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक व अमरावती ही प्रशिक्षण केंद्र होती. पदवी, पदवीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. केंद्रात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. या परीक्षेचा निकाल २८ मार्चला लागणार आहे.

परीक्षेतील ऑनलाईन गोंधळ

१) कॉमन इन्ट्रान्स टेस्टला इंटर

केल्यावर त्यामध्ये बिघाड दाखवीत होते.

२) पुढील प्रोसेस सुरू झाली नाही.त्यानंतर अर्ध्या तासाने संकेतस्थळ सुरू झाले. परंतु कॅमेरासाठी परवानगी मागितली तर बिघाड झाला.

3)२१ मार्च रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा असल्याकारणाने उमेदवारांनी दोन वेळा याबाबत प्रयत्न केला पण सतत तांत्रिक अडचणी आल्याने उमेदवारांना या परीक्षेपासून मुकावे लागले.

४) पुन्हा २ वाजता लॉगिन केल्यावर प्रक्रिया सुरू झाली व परीक्षा सुरू झाली, मात्र कॅमेरा सुरू झालाच नाही.