शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 20:45 IST

या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रूक, म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे.

ठळक मुद्देगावांचा होणार जलद विकास : पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत ई-लिलाव पद्धतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ई-लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार

पुणे : पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने खाजगी विकासकांना देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया करण्यात येत आहे.या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रूक, म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ७१४९८.८६ चौरसमीटर आहे. या भूखंडाचा वापर त्याच्या अनुज्ञेय वापरासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे या गावांमध्ये शाळा, दवाखाने, शिशुवर्ग, मनोरंजन पार्क, क्रीडांगण, व्यायामशाळा, बँक एटीएम, सायबर लायब्ररी, खुला बाजार, क्रीडा संकुल, बागबगीचा, खरेदी सुविधा, प्राथमिक व माध्यमिक शाळा, वाहनतळ, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्र व इतर उपयोगी सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. ई-लिलाव पद्धतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर निविदाधारकांसाठी शदिवारी (दि.१९) पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निविदा सादर करण्यास सोमवार (दि.११) पर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. निविदापूर्व बैठक (दि. १९) रोजी दुपारी ४ वाजता पीएमआरडीए कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या निविदेची ई-लिलाव प्रक्रिया २५ जून २०१८ रोजी सकाळी ११ ते सायकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर ई-लिलाव पद्धतीमध्ये समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व माहिती उपलब्ध आहे....................भूखंड अनुज्ञेय वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने दिले जातील. ई-लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याचा अनुज्ञेय वापर पाहता या सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास मदत होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते