शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात :महागड्या गिफ्टच्या आमिषाने  लाखोंचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 17:32 IST

फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करुन त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करुन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत.

पुणे : फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करुन त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करुन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. मॉडेल कॉलनीत राहणारी एक ज्येष्ठ नागरिक महिला या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगद सापडली़ त्यांनी सव्वा चार लाख रुपयांना गंडा घातला.            या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ऑस्कर वॉलकॉट, रुषिका आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६० वर्षाच्या निवृत्त महिलेने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार १६ जुलै ते २७ डिसेंबर २०१८ दरम्यान घडला.  याबाबत पोलिसांनी सांगितले की,  या महिला निवृत्त झाल्या असून त्यांची गेल्या वर्षी ऑस्कर वॉलकॉट नावाच्या व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री झाली़.  त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर शेअर केले़ वॉलकॉट याने या महिलेला एक महागडे पार्सल पाठविले असल्याचे सांगितले़.  त्यानंतर रुषिका असे नाव सांगणाऱ्या  महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला़.  कस्टमने तुमच्या नावाने आलेले पार्सल अडविले असून त्याची कस्टम ड्युटी द्यावी लागेल, असा  बहाणा  करुन त्यांना बँक खात्यात वेळोवेळी ३ लाख ५७ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले़.  त्यानंतर दोघांनी त्यांना बँकेतून बोलत असून त्यांच्या अकाऊंटची माहिती घेऊन पेटीएम द्वारे त्यांच्या बँक खात्यातून ६४ हजार १३६ रुपये काढून घेतले़.  त्यांनी नंतर वॉलकॉट याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ पण त्याचा संपर्क होत नव्हता व पार्सलही मिळाले नाही़.  तसेच बँक खात्यातून परस्पर पैसे काढले गेल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुक