शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

‘नेत्रवारी’साठी फेसबुक दिंडी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:08 IST

‘आम्ही नेत्रदान करणार, तुम्हीही करा. चला नेत्रवारीमध्ये सहभागी होऊ या..’ असे ब्रीदवाक्य सोबत घेऊन फेसबुक दिंडी टीमने उत्साहात या अभियानाला प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देअंध बांधवांसाठी नेत्रदान अभियानास प्रारंभफेसबुकच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदानासाठी फेसबुक दिंडीच्या टीमने नेटकऱ्यांना आवाहन

बारामती : आठ वर्षांपासून नेटकऱ्यांना पालखी सोहळ्याचा जिवंत अनुभव देणाऱ्या फेसबुक दिंडी यावर्षी ‘नेत्रवारी’ अभियान राबविण्यास सज्ज झाली आहे. फेसबुकच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदानासाठी फेसबुक दिंडीच्या टीमने नेटकऱ्यांना आवाहन केले आहे.  यावर्षी फेसबुक दिंडीचे हे ८वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी टीमने व्यंकटेश परिवार, औरंगाबाद या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘नेत्रवारी’ अभियानास प्रारंभ केला आहे. ‘आम्ही नेत्रदान करणार, तुम्हीही करा. चला नेत्रवारीमध्ये सहभागी होऊ या..’ असे ब्रीदवाक्य सोबत घेऊन फेसबुक दिंडी टीमने उत्साहात या अभियानाला प्रारंभ केला आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासचे दर्शन घडविणारी एक महान परंपरा. या वारी परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती-धर्मांना, पंथांना सामावून घेतले. महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेच दर्शन घडवणारी वारी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासारखे दुसरे सुख नाही. ‘पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा पाहीन मी याचि देही याचि डोळा’ असे म्हणत आजही लाखो वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाचे गोजिरे रूप पाहण्यासाठी वारीत पंढरपूरपर्यंत पायी जातात.परंतु, आजही समाजातील एक घटक हा सुखसोहळा पाहण्यापासून वंचित आहे. समाजातील अंध बांधवांना दृष्टीसुख मिळावे; त्यांनीही हा अनुपम सुखसोहळा याचि डोळा अनुभवावा, या भावनेतून ‘नेत्रवारी’ अभियानाची संकल्पना उदयास आली, अशी माहिती स्वप्निल मोरे यांनी दिली. फेसबुक दिंडीच्या अ‍ॅपवर नेत्रदानाचे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘रंगविशेष’ टीमने फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व लोकांना नेत्रदानाचे भावनिक आवाहन करणारा ‘नेत्रवारी’ नावाचा लघुपटही बनवला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.२०१६मध्ये फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या ‘पाणी वाचवा’ या जलसंधारणाच्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच गतवर्षी वारी ‘ती’ची या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या ‘नेत्रवारी’ मोहिमेला देखील भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार मरकळे, सुमीत चव्हाण, ओंकार महामुनी यांनी व्यक्त केला आहे. 

 

टॅग्स :BaramatiबारामतीFacebookफेसबुकAshadhi Ekadashiआषाढी एकादशीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा