शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उसाचा तोडा लांबला

By admin | Updated: December 29, 2014 00:53 IST

मावळ तालुक्यात उसाचा तोडा लांबला आहे. तोडणीस उशीर झाल्याने वजन कमी होवूून तसेच, अनेक कारणांमुळे उस उत्पादन घटण्याच्या

पिंपरी : मावळ तालुक्यात उसाचा तोडा लांबला आहे. तोडणीस उशीर झाल्याने वजन कमी होवूून तसेच, अनेक कारणांमुळे उस उत्पादन घटण्याच्या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कोणाकडे पहावे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. शेतमजूरांच्या कमतरतेमुळे तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी तरकारी पिक लागवडीखालील क्षेत्र कमी केले. या वर्षी ऊस लागवडीखालील क्षेत्र ७ हजार ६७० हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्यातून कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यास साडेपाच लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला आहे. या उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांकडून ढासळत असल्याचा प्रत्यय येत आहे. काही शेतकऱ्यांचा ऊस तुटण्याची तारीख उलटून दीड महिना झाला. तरी अद्याप तोडणी झालेली नाही. जवळीक असणारे सुखीआपलाच ऊस तोडावा म्हणून अनेक शेतकरी सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांपैकी काही शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात आहे. याचबरोबर ज्या धनाढ्य शेतकऱ्यांची व्यवस्थापनाशी जवळीक आहे, अशांच्याच शेतामधील ऊसाची तोडणी लवकर केली जाते. आमच्या शेतामधील ऊस दीड ते दोन महिने होऊनही तोडला जात नाही. विशेषत: उन्हाळ्यापर्यंत उशीर झाल्यास उसाला तुरे येतात. गाभ्याचा भाग पोकळ होवून २० टक्क्यांपर्यंत वजन घटते. त्यामुळे नुकसान होत असल्याची कैफियत शेतकरी मांडत आहेत.(प्रतिनिधी)