शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या पुणे विभागातून सीईटी व युपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 19:25 IST

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये १८० केंद्र असून सुमारे ५ लाख ४१ हजार विद्यार्थी परीक्षा देणार..

ठळक मुद्देराज्यात दि. १ ते २० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पध्दतीने प्रवेश परीक्षा होणार विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बस सोडण्यात येणार

पुणे : राज्यभरात दि. १ ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) तसेच दि. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) पूर्व परीक्षेसाठी एसटी महामंडळाकडून जादा बस बस सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार एसटीच्या पुणे विभागातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राकडून राज्यात दि. १ ते २० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पध्दतीने प्रवेश परीक्षा होणार आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये १८० केंद्र असून सुमारे ५ लाख ४१ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्रांची ठिकाणे असलेल्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटीकडून बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच दि. ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ३८ उपकेंद्रांवर युपीएससीची परीक्षा होणार आहे. त्यासाठी दि. ३ ते ५ ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर रोजी असे चार दिवस जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बससाठी विद्यार्थ्यांनी लांब पल्ला व मध्यम लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

वाहतुक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातून परीक्षांच्या दिवशी नियमित बससेवा सुरू असेल. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आरक्षण केल्यास किंवा त्याबाबत विविध ठिकाणांहून एकत्रित ने-आण करण्याची पूर्वकल्पना दिल्यास त्यानुसार नियोजन करता येईल.’

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थी