बहि:स्थ विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू
By Admin | Updated: June 30, 2015 00:46 IST2015-06-30T00:46:07+5:302015-06-30T00:46:07+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला

बहि:स्थ विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला बहि:स्थ पद्धतीने (अर्ज क्रमांक १७) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज व माहिती पुस्तिका विभागीय मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज याच मुदतीत संपर्क केंद्र किंवा विभागीय मंडळाकडे, तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाकडे अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज क्र. १७ हा परीक्षेचा अर्ज नसून तो केवळ खासगी रीतीने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यास पात्रता ठरविण्यासाठीचा नाव नोंदणी अर्ज आहे. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेसाठी परीक्षा शुल्कासह स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले.
परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळ कार्यालय, संपर्क केंद्र वा कनिष्ठ महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
-फेब्रुवारी व मार्च २०१६मध्ये बसणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षार्थींना विनाविलंब शुल्कासह अर्ज क्र. १७ भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर, विलंब शुल्क भरून विद्यार्थी १० आॅगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. अतिविलंब शुल्क भरून १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल.