शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बहि:स्थच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:41 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थच्या विभागातील बीए, बीकॉम या पदवी प्रथम वर्ष व एमए, एमकॉम या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थच्या विभागातील बीए, बीकॉम या पदवी प्रथम वर्ष व एमए, एमकॉम या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील बहि:स्थ विभागाच्या लिंकवर जाऊन इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बहि:स्थ विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आल्याची लिंक मंगळवारी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाईल तयार करायचे आहे. हे प्रोफाईल तयार करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक आवश्यक असेल. विद्यार्थ्यांनी लॉग आयडी तयार केल्यानंतर त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती त्यावर भरावी लागेल.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता राज्यात एकाही विद्यापीठात बहि:स्थ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागात राज्यभरातून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे बहि:स्थ विभागात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बहि:स्थ विभागातून मिळालेली पदवी इतर कोणत्याही विद्यापीठाच्या समकक्ष मानली जाते.संस्थाचालकांच्या दबावातून काही दिवसांपूर्वी बहि:स्थ विभागाचे शुल्क तिपटीने वाढविण्यात आले होते. बहि:स्थ विभागामुळे महाविद्यालयांचे प्रवेश कमी होत असल्याची तक्रार करून छुप्या पद्धतीने बहि:स्थची शुल्कवाढ करण्यात आली होती. याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन ही शुल्कवाढ मागे घेतली आहे.प्रक्रिया सुरू; मात्र वेळापत्रकाची माहिती नाहीबहि:स्थ विभागाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून करण्यात आले आहे. मात्र, प्रवेश अर्ज भरण्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे, पुढील कार्यवाही काय करायची, याबाबतचे वेळापत्रकच देण्यात आलेले नाही.फोन उचलला जात नसल्याने विद्यार्थी त्रस्तसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागाकडून चौकशी, तक्रारीबांबत संपर्क साधण्यासाठी एकूण ६ क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, यांतील पहिला क्रमांक दुसºयाच विभागाचा दिलेला आहे, तर उर्वरित क्रमांकावर फोन उचलले जात नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. बहि:स्थ विभागाकडून चौकशीसाठी ०२०-२५६०११११४, ०२०-२५६०११५, ८२७५६९७६३४, ८२७५६९८१९६ असे क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, या क्रमांकावर फोन केला असता उचलला जात नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षण