शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:29 IST

आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी, असे मत डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे१० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित अवयवदान प्रसार अभियानाचा समारोपग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा : चाफेकर

पुणे : आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी. त्यासाठी अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.वंचित विकास, शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट व हॅन्डरायटिंग अ‍ॅनालिसिस रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या वतीने १० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान प्रसार अभियानाचा समारोप डॉ. चाफेकर यांच्या उपस्थित सारसबाग गणपती मंदिराच्या परिसरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अभियानाचे प्रमुख डॉ. मधुसूदन घाणेकर, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर डॉ. सुधीर कुलाल, विजय दामले आदी उपस्थित होते.डॉ. चाफेकर म्हणाले, ‘ग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी पुण्याच्या विविध भागात फिरून अवयवदानाचे महत्त्व सांगण्यात आले. यातून हजारो लोकांपर्यंत त्यांनी अवयवदानाचा संदेश पोहोचवला आहे. प्रत्येकाने अवयदानाचा गांभीर्याने विचार केल्यास अनेकांना नव्याने आयुष्य जगात येईल. आपले अस्तित्व इतरांच्या रूपाने कायम राहील.’डॉ. घाणेकर म्हणाले, ‘अवयवदानाबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी प्रसार होणे गरजेचे आहे. या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी अवयवदानात योगदान दिले आहे, अशा व्यक्तींच्या वारसांचा सन्मान केला पाहिजे. येत्या काळात याबाबत परिषद भरवून त्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न आहे.’मीना कुर्लेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर कुलाल यांनी आभार मानले. 

टॅग्स :Organ donationअवयव दानPuneपुणे