शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

काँक्रिटीकरणाला अखेर मुदतवाढ : आयुक्तांचा आदेश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:15 PM

रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर आयुक्त कुणाल कुमार यांनी मुदतवाढ दिली.

ठळक मुद्देनगरसेवकांच्या दबावापुढे झुकलेया निर्णयामुळे वर्षभरात महापालिकेच्या किमान १०० कोटी रूपयांचे नुकसान होणार

पुणे : रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर आयुक्त कुणाल कुमार यांनी मुदतवाढ दिली. २४ तास पाणी योजनेचे काम सुरू होणार असल्याने त्यांनीच १२ मीटर किंवा त्या आतील सर्व रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला मनाई केली होती. मात्र, नगरसेवकांच्या दबावापुढे त्यांना आग्रह मागे घेत हा निर्णय घेतले असल्याचे दिसते आहे.सजग नागरिक मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर म्हणाले,आयुक्तांच्या या निर्णयामुळे वर्षभरात महापालिकेच्या किमान १०० कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे.कारण,रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले की लगेचच २४ तास पाणी योजनेचे काम सुरू होणार आहे. त्यात संपूर्ण शहरात नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार असून त्यासाठी रस्ते खोदावे लागणार आहेत.सिमेंटचा अर्धा किलोमीटरचा व ६ मीटर रूंदीचा रस्ता तयार करायचा असेल तर त्याचा खर्च किमान २ कोटी रूपये येतो. तो रस्ता किमान १० वर्षे टिकणे अपेक्षित असताना आयुक्तांच्या या निर्णयामुळे केवळ वर्षभरातच तो रस्ता खोदावा लागेल. या रस्त्याचा खर्च जास्त असल्यामुळे बहुसंख्य नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गल्लीबोळ सिमेंटचे करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशामुळे त्याला सक्तीची मनाई आली होती. आता ती त्यांनीच दबाव टाकून दूर केली आहे, त्यामुळे खर्च तर होणारच व तो वायाही जाणार अशी स्थिती आली असल्याची टीका वेलणकर यांनी केली. ........महापालिकेचे नुकसान म्हणजे पर्यायाने नागरिकांचेच नुकसान आहे. त्यामुळे आता ठिकठिकाणच्या नागरिकांनीच आपल्या नगरसेवकाला कोणताही रस्ता सध्या तरी सिमेंटचा करू नका असे सांगितले पाहिजे. त्याशिवाय हा अनाठायी व शंभर टक्के वाया जाणारा खर्च थांबणार नाही,                                                 विवेक वेलणकर  

टॅग्स :Puneपुणेkunal kumarकुणाल कुमारVivek Velankarविवेक वेलणकर