शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या अन् दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवा: राज्य शासनाला पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 17:24 IST

लसीकरणानंतर सुद्धा कोरोना संसर्ग झाल्याची काही उदाहरणे समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण

पुणे : कोरोनाचा पुन्हा एकदा नव्याने उद्रेक पाहायला मिळतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर पुणे शहरात कोरोनाग्रस्तांची वर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे. दरम्यान, लसीकरणाची मोहीम देखील जोरदार सुरु आहे. मात्र लसीकरणानंतर सुद्धा कोरोना संसर्ग झाल्याची काही उदाहरणे समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, लसीकरणाच्या पहिला डोस व दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवावे,अशी मागणी राज्य सरकारचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे आणि पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी राज्य शासनाकडे पत्राद्वारे केली आहे. 

डॉ. सुभाष साळुंखे पत्रात म्हणतात, जागतिक स्तरावर कोरोनाचे नवे नवे स्ट्रेन आढळून येत आहे. आणि नवीन स्ट्रेनचा संसर्ग भारतात देखील पोहचला असून काही रुग्णही सापडले आहे. मात्र, आपल्याकडे कोरोना प्रतिबंधक लस देताना सर्वसाधारणपणे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन अशाच दोनच प्रकारच्या लस दिल्या जात आहे. ज्या जुन्या स्ट्रेनच्या कोरोनाचा अभ्यास करून तयार केल्या आहेत. त्याचा प्रभाव नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाच्या स्ट्रेनवर कितपत होतो आहे हे तपासणे गरजेचे आहे.

सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन ही लस टोचली जात आहे. या लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारण २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जात आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या डोस मध्ये असलेले अंतर वाढविण्यात यावे अशी मागणी डॉ. साळुंखे आणि आशिष भारती यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांपासून ते पुढील तीन आठवड्यात कधीही घेतला तरी चालेल असे स्पष्ट केले आहे. 

तसेच कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची ९० टक्के शक्यता असते. तर दुसरा डोस घेतल्यानंतर १० टक्के शक्यता आहे. मात्र कोरोना संक्रमण टाळणाचा धोका टाळणे हा कोरोना लसीकरणापाठीमागचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर कोरोनाची सौम्य लक्षणे आढळतात आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असे कोरोनाच्या मानवी चाचण्यांमधला निष्कर्ष आहे. त्यामुळे अत्यवस्थ स्थिती निर्माण न होण्यासाठी लस दिली जात आहे, असेही साळुंखे यांनी या पत्रात नमूद केले आहे. 

 डॉ. आशिष भारती म्हणाले, १३ मार्च रोजी मी कोरोना लसीचा पहिला दपोस घेतला. पण चार दिवसानंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र मला कोणत्याही प्रकारचे कोरोना लक्षणे नाही. मी सुस्थितीत आहे. तसेच माझ्या पत्नीने कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी तिला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोना लसीकरणाच्या दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील कालावधी वाढविणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकार