वृद्धेची हत्या करून बलात्कार केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST2021-05-26T04:11:52+5:302021-05-26T04:11:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील एका ७१ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तिच्या राहत्या घरी सोमवारी खून ...

Exposed to murder and rape of an old woman | वृद्धेची हत्या करून बलात्कार केल्याचे उघड

वृद्धेची हत्या करून बलात्कार केल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील एका ७१ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तिच्या राहत्या घरी सोमवारी खून झाला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून शरीर संबंधास नकार दिल्याने तिचा खून करण्यात आला. यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

सखुबाई बबन राऊत (वय ७१, रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनिल सुदाम वाघमारे (वय ५२, रा. कुरकुंडी ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी विमल शिवाजीराव राऊत यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: अनिल वाघमारे याने वयोवृध्द सखूबाई यांच्या घरात घुसून त्यांचेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी त्याला प्रतिकार केला. यामुळे आरोपी वाघमारे याने तिच्या डोक्यात घरात असलेल्या चुलीसमोरील लोखंडी फुकणीने सखूबाई यांना मारहाण करत त्यांना ठार मारले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वाघमारे यांने त्यांच्या मृत शरीरासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी वाघमारे याला मंगळवारी सकाळी अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

फोटो : मृत सखुबाई राऊत

फोटो : आरोपी अनिल वाघमारे

Web Title: Exposed to murder and rape of an old woman