शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिगर बासमतीची निर्यात घटली ; निर्यात वाढीसाठी ५ टक्के अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 13:20 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतासह पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, चायनामधून मोठ्या प्रमाणात बिगर बासमती तांदूळ निर्यात केला जातो.

ठळक मुद्देशासनाचे चालू वर्षांत ८० ते ९० लाख टन तांदूळ निर्यात करण्याचे उद्दिष्टतांदळाच्या भावात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ बिगर बासमती तांदळाला हमीभाव दर लागू चालू वर्षी बिगर बासमती तांदूळाच्या निर्यात तब्बल १३ टक्क्यांनी घटगेल्या वर्षी हे प्रमाण ४३ लाख टन एवढे

पुणे : बिगर बासमती तांदळाच्या निर्यात झालेली घट लक्षात घेता सरकारने मचंर्टाईज एक्पोर्ट फोरम इंडिया (एमईएस) ही योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत डिसेंबर ते मार्च २०१९ पर्यंत निर्यात होणाऱ्या बिगर बासमती तांदळावर निर्यातदारांना केंद्र सरकारमार्फत ५ टक्के रक्कम इन्सेटिव्ह स्वरुपात देण्यात येणार आहे. चालू वर्षी ८० ते ९० लाख टन तांदूळ निर्यात करण्याचे सरकारचे उद्द्ष्टि आहे. गत वर्षी निर्यातीत झालेली मोठी घट लक्षात घेऊन शासनाने एमईएस ही योजना राबविली असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली. बिगर बासमती तांदळाला हमीभाव दर लागू झाल्यानंतर तांदळाच्या भावात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतीय बिगर बासमती तांदूळ महागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाला मागणी घटली आहे. परिणामी, चालू वर्षी बिगर बासमती तांदूळाच्या निर्यात तब्बल १३ टक्क्यांनी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भारतीय तांदळाची घसरण होत असल्याने केंद्र सरकारने निर्यात वाढीसाठी एमईएस योजना जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतासह पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, चायनामधून मोठ्या प्रमाणात बिगर बासमती तांदूळ निर्यात केला जातो. यामध्ये, भारतातून सर्वाधिक तांदूळाची निर्यात करण्यात येते. यंदा प्रथमच केंद्र सरकारकडून भातासाठी मूल्यवर्धित दर लागू करण्यात आला. त्यामुळे भाताचे भाव तब्बल दोनशे रुपयांनी वाढ होऊन प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भाताचे भाव दहा टक्क्यांनी जास्त निघाले. त्यामुळे, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया व आफ्रिका आदी देशांनी भारतातून येणाºया महागड्या तांदळाऐवजी इतर देशांकडून तांदूळ खरेदी करण्यास प्राधान्य दिले. त्याचा परिणाम तांदळाच्या निर्यातीवर होऊन २०१८-१९ च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ३७.२० लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी हे प्रमाण ४३ लाख टन एवढे होते. 

टॅग्स :Puneपुणे