वडगाव शेरीत गॅस सिलेंडरचा स्फोटात १० जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 10:28 IST2020-09-02T09:57:20+5:302020-09-02T10:28:24+5:30
स्फोटाच्या तिव्रतेन आजु बाजूच्या घरांचे खिडक्या व भिंती कोसळल्या आहेत. त्यांचेही पंचनामे करण्यात येत आहे.

वडगाव शेरीत गॅस सिलेंडरचा स्फोटात १० जण जखमी
पुणे - वडगाव शेरीमधील गणेशनगर भागातील लेन नं.10 मधील दोन मजली इमारतीतील दुसºया मजल्यावर घरगुती गॅसचा स्फोट होऊन १० गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यात इमारतीचा दुसरा व तिसरा मजला पूर्णपणे कोसळला आहे़ तसेच शेजारी इमारतीचेही नुकसान झाले आहे. जखमी झालेल्यांमध्ये २ पुरुष, ४ स्त्रिया व ४ मुलींचा समावेश आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला़ अग्निशमन दलाला ६ वाजून ५३ मिनिटांनी याची खबर मिळाली़ अग्निशमन दल पोहोचण्याआधी काही जखमींना स्थानिकांनी दवाखान्यात रवाना केले़ तसेच अग्निशामन दलाने ३ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. या स्फोटात बाळासाहेब आप्पाजी भोंडवे (वय ५०), निरा बाळासाहेब भोंडवे (वय ४५), अनुराधा बाळासाहेब भोंडवे (वय २०) या जागा मालक तिंघावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यात तीन भाडेकरू जखमी आहेत मात्र त्यांची माहीती उपलब्ध झालेली नाहीत.
या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान स्थानिक नगरसेवक महेंद्र पठारे, उषा कळमकर यांनी मनपा अधिकारी ,पोलिस व अग्निशमन यांना कळवून बाजूच्या चार घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. स्फोट इतका जोरात होता कि इमारतीचे दुसरा व तिसरा मजला पुर्ण निकामा झाला आहे. स्फोटाच्या तीव्रतेने आजु बाजूच्या घरांचे खिडक्या व भिंती कोसळल्या आहेत.