शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नीरा येथील ज्युबलिएन्ट एन्ग्रेनव्हिया कंपनीत स्फोट, तीन कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:43 IST

ऍसिड कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करत असताना स्फोट होऊन यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे...

नीरा (पुणे) : नीरा येथील घातक रसायन निर्मिती करणाऱ्या ज्युबिलानट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये आज मेंटेनन्सचे काम सुरू असताना येथील ऍसिड कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करत असताना स्फोट होऊन यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. तर मेंटेनन्सचे काम सुरू असताना दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्यावतीने देण्यात आली आहे. 

पुरंदर आणि बारामतीच्या सीमेवर असलेल्या कंपनीमध्ये अनेक वेळा अपघात होत असतात. मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघात लोकांच्या अजूनही लक्षात असून आज शनिवारी पुन्हा एकदा या कंपनीमध्ये सकाळी ११ वाजलेच्या सुमारास एक स्पोट झाला इथेनॉल असिट प्लांटच्या मेंटनंसचे काम सुरू असताना हा स्पॉट झाला. या स्फोटामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.

परराज्यातील पवन कुमार व भरत सिंग हे जखमी झाले आहेत. एका युवकांचे नाव समजून शकले नाही. एक युवक अत्यवस्थ असल्याने त्याला पुणे येथील रुग्णालयात पाठवल्याचे लोणंदच्या खासगी रुग्णालयाकडून सांगितले आहे. यामध्ये तिघा जणांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर यातील एकाला पुन्हा लोणंद येथून उपचारासाठी पुण्यामध्ये पाठवण्यात आले आहे. तर याध्ये एकूण चार जण जखमी असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. या संदर्भात कंपनी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी यामध्ये दोन जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुसरा दिला आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड