रविवारी अनुभवा धमाल गल्लीची रंगत

By Admin | Updated: April 28, 2017 05:59 IST2017-04-28T05:59:46+5:302017-04-28T05:59:46+5:30

आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल

Experiences dazzling lanyard on Sunday | रविवारी अनुभवा धमाल गल्लीची रंगत

रविवारी अनुभवा धमाल गल्लीची रंगत

पुणे : आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल करण्याची संधी मिळेल. मेघदूत हॉटेल गंगाधाम सोसायटी, मार्केट यार्ड येथे दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत धमाल गल्लीत मिळणार आहे. यात फक्त मनोरंजन होणार नाही, तर लहान मुलांवर चांगले संस्कार तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल. फिटनेस मंत्राज्द्वारे या ठिकाणी मोफत आरोग्य व बीएमआयसंदर्भात सल्ला दिला जाईल. एच. पी. ज्वेलर्सतर्फे विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत, तसेच सायकल वर्ल्डतर्फे विविध प्रकारांतील सायकल चालवण्याची संधी लाभणार आहे. प्रायोजक मेपल ग्रुप, ट्री हाऊस स्कूल, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज्, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, सायकल पार्टनर- सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर- एच. पी. ज्वेलर्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडेल.

Web Title: Experiences dazzling lanyard on Sunday