‘लहानपण देगा’ची आली अनुभूती

By Admin | Updated: November 16, 2016 02:14 IST2016-11-16T02:14:50+5:302016-11-16T02:14:50+5:30

आपल्या विनोदी करामतीमधून लहानांनाच नव्हे तर मोठ्यांनाही वय विसरायला लावणाऱ्या हलक्या-फुलक्या घटनांमधून निखळ मनोरंजन

The experience will be 'childhood' | ‘लहानपण देगा’ची आली अनुभूती

‘लहानपण देगा’ची आली अनुभूती

पुणे : आपल्या विनोदी करामतीमधून लहानांनाच नव्हे तर मोठ्यांनाही वय विसरायला लावणाऱ्या हलक्या-फुलक्या घटनांमधून निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘देनीसच्या गोष्टी’ ऐकत लहानग्यांसह थोरांनीही ‘बालपणाची’ अनुभूती घेतली. निमित्त होते, डॉ. अनघा भट यांनी अनुवादित केलेल्या ‘देनीसच्या गोष्टी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे.
अक्षरधारा आणि पायोनियर प्रकाशनातर्फे रशियन लेखक वीक्तर द्रागूनस्की लिखित ‘देनीस्किनी रस्काझी’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘देनीसच्या गोष्टी’चे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते झाले. ‘राजतिलक’ नावाची गोष्ट सांगताना गावस्कर यांनी मुलांनाही त्यात सहभागी करून घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: The experience will be 'childhood'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.