शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

अन्वीच्या उपचारासाठी 18 कोटींचा खर्च, रोहित पवारांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:12 IST

पिपरीतील एका चिमुकलीवरही अशाच महागड्या उपाचाराची गरज आहे. तिच्यासाठीही मदतीची अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपिंपरीतील आरती वाव्हळ यांची मुलगी अन्वी हिला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून त्यावरील उपचारासाठी १६ ते १८ कोटी ₹ एवढा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे. या आजारावरील औषधं परदेशातून आणावी लागत असल्याने त्यावर टॅक्सही कोट्यवधी रुपयांचा भरावा लागतो

पुणे - तीरा कामत या मुलीच्या दुर्मिळ आजारावर उपचार यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील वेदिका शिंदे, ह्या पुण्यातल्या 11 महिन्यांच्या मुलीला एसएमए प्रकार-1 असल्याचे निदान झाले. हा एक दुर्मिळ जेनेटीक आजार असून 2 वर्षांच्या आधीच शिशुचे प्राण जाऊ शकतात. वेदिकाच्या आई-वडिलांच्या प्रयत्नांना, समाजिक पाठिंब्यालाही यश मिळालं. अखेर, वेदिकाला 16 कोटींचं इजेक्शनही देण्यात आलं. पण, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. आता, तीरा कामतप्रमाणेच पिंपरीतील तन्वी या चिमुकलीलाही दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली.  

एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. वेदिकाच्या पालकांनी क्राऊड फंडींच्या माध्यमातून 14.3 कोटी जमा केले. तर सरकारी यंत्रणांकडून कर आणि आयात शुल्क माफ करण्यामध्ये पालकांना यश आले. त्यानंतर, वेदिकाला हे इंजेक्शनही देण्यात आले. वेदिकाच्या लढ्यात पाठिशी असलेल्या जगभरातील नागरिकांना याचा आनंद झाला. मात्र, दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी वेदिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे वेदिकाच्या मृत्यूनं अनेकांचे डोळे पाणावले. आता, पिपरीतील एका चिमुकलीवरही अशाच महागड्या उपाचाराची गरज आहे. तिच्यासाठीही मदतीची अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. पिंपरीतील आरती वाव्हळ यांची मुलगी अन्वी हिला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून त्यावरील उपचारासाठी १६ ते १८ कोटी ₹ एवढा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे. या आजारावरील औषधं परदेशातून आणावी लागत असल्याने त्यावर टॅक्सही कोट्यवधी रुपयांचा भरावा लागतो. औषधांचा आणि टॅक्सचा हा प्रचंड खर्च कोणत्याही सामान्य माणसाला परवडू शकत नाही. त्यामुळं टॅक्स माफ करण्यात यावा आणि या औषधांबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन सरकारने आणि लोकांनीही उपचारासाठी मदत करावी, अशी विनंत आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पत्र लिहून सर्वोतोपरी मदत करण्याची विनंतीही केली आहे.   

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारmedicineऔषधंpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड